शिवसेना : उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे २५ आमदारांसह ‘गायब’ आहेत. तर दुसरीकडे फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीनंतर ठाकरे सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. खरे तर शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेना संपर्क करत असून शिंदे प्रतिसाद देत नाहीत. शिंदे हे नॉट रिचेबल आहे आणि समस्या अशी आहे की ते एकटे नसून त्यांच्यासोबत शिवसेनेचे 25 आमदारही आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा नेत्यांनी भेट घेतल्याचं समजत आहे, शिंदे हे गुजरातमधील सुरत शहरातील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे व त्यांच्यासोबत अजून 25 ते 30 आमदार असल्याचे सांगण्यात येत आहेत
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम