Lalit Patil case| ड्रग्ज माफिया ललित पाटील असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात…

0
1

Lalit Patil case| :  ललित पाटील अखेर मुंबई पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे.  चेन्नईमध्ये जाऊन मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली आहे.  ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा एक भाग आहे. ड्रग सिंडिकेट ललितला वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करत होते. पण ललित मात्र कोणाच्याही हाती लागत नव्हता. पण अखेर ललित पाटीलने एक चूक केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

एकीकडे पुणे पोलिसही ललितच्या मागावर होते.  तर दुसरीकडे साकीनाका पोलिस ललितला पकडण्यासाठी सापळा रचत होते. आणि त्यांना यात यश आले. साकीनाका पोलीसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललितने नवीन नंबरने फोन केला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यानंकर पोलीसांनी गोपनीयता बाळगत  तीन पथके ललितच्या शोधासाठी रवाना केली. ललित पाटील व ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज बोलणे व्हायचे. आणि यावरूनच पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींची माहिती मिळत होती.

Israel Hamas War: इस्रायलविरोधात जगभरातील मुस्लिम एकवटले, सौदीत ५७ देशांची तातडीची बैठक

कुठे होता ललित पाटील?

एकीकडे फरार ललित पाटील प्रकरणावरून राज्याभरात वातावरण तापले होते. दरम्यान, ललितला पळून जाण्यासाठी एका बड्या नेत्याने मदत केल्याचे आरोप होत होते. पण दुसरीकडे, ललित पाटील एका ट्रॅव्हल कंपनीच्या गाडीने त्याच्या दोन सहकाऱ्यांसह गुजरात, धुळे, कर्नाटक आणि मग बंगळूरूला पोहोचला. पण यादरम्यान ललित आणि पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी हे संपर्कात होते. अखेर चेन्नईत एका हॉटेलमध्ये तो असताना पोलिसांनी सापळा रचून ललित पाटील आणि त्याच्या आणखी दोन  साथीदारांना ताब्यात घेतले. आज सकाळी आठ पर्यंत त्याला मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे.

अशी केली अटक

काही दिवसांपूर्वी मुंबई- साकीनाका पोलिसांनी नाशिकमध्ये छापा टाकला होता व त्यात त्यांनी कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. आणि त्यानंतरच ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता.  पुणे पोलीस त्याच्या मागावर असताना मुंबई – साकीनाका पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगत तीन पथक  ललित पाटीलच्या शोधासाठी रवाना केले होते. आणि सापळा रचत त्याला चेन्नईच्या एक हॉटेलमधून त्याच्या दोन साथीदारांसह अटक केली आहे. (Lalit Patil case)Big News | काय सांगता..! पुजाऱ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ झाला व्हायरल


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here