chandwad| महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागांमध्ये हुंड्याची प्रथा अजूनही सुरू आहे. यामुळे अजूनही मुलीच्या घरच्यांना व मुलींना अनेक त्रास सहन करावे लागतात. या देण्या-घेण्यावरून अनेक महिलांचा सासरच्यांकडून छळ होत असतो. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या शिंदे गावात घडली आहे.
Manoj Jarange| त्यांच्या कानात बोळे घातलेय का..?, आता बोलता येतंय तोपर्यंतच या- मनोज जरांगे
निशा शिंदे ह्या महिलेला तिच्या सासरचे गाडी घेण्यासाठी माहेरच्यांकडून २ लाख रुपये घेऊन ये. अशी मागणी करत होते. ह्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून निशा शिंदे हिचा छळदेखील ते करत होते. सासरच्यांच्या ह्या त्रासाला कंटाळून निशा शिंदे ह्या विवाहित महिलेने शेतातीलच विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हुंडाबळीच्या अंतर्गत महिलेचे सासू, सासरे आणि महिलेचा पती यांसह महिलेच्या इतर सासरच्या नातेवाईकांच्या विरोधातही पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील सविस्तर तपास पोलिस करत आहेत. (chandwad)
Big News | मराठा समाज आक्रमक; दौंडमध्ये मराठा आंदोलनकांनी राऊतांना अडवलं!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम