Big News | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या बारामती दौऱ्याला मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवलेला आहे. दौंडमधील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये संजय राऊत थांबलेले आहेत. या हॉटेलबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकत्र आलेत. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांकडून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यावेळीदेखील आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
Devendra fadanvis| मी ब्राह्मण म्हणून सॉफ्ट टार्गेट; देवेंद्र फडणवीस यांचे धक्कादायक खुलासे
मराठा समाज आता आरक्षण या मुद्यावर आक्रमक झालेला आहे. अनेक गावांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार अनेक गावांमध्ये मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता खासदार संजय राऊत यांच्या बारामती दौऱ्याला मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवलेला आहे.
कांदा प्रश्न पुन्हा पेटणार? शेतकरी विरोधी सरकारचा निर्णय पुन्हा शेतकऱ्यांच्या मुळावर
जरांगे यांनी सरकारवर केली सडकून टिका
आरक्षण मिळावं तसेच मराठा समाजातील दुर्बल घटकांना लाभ मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या उपोषण करता आहेत. जरांगेंच्या उपोषणाचा हा तिसरा टप्पा आहे. या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकार वर सडकून टीका केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आरक्षणावर का बोलत नाहीत? दोन दिवसात आरक्षण देतो असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का म्हणत नाहीत? असा सवाल थरथकत्या आवाजात मनोज जरांगे-पाटील यांनी शिंदे सरकारला विचारलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम