मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रीय हिंदी संगोष्टी व शिबिराचे उद्घाटन

0
39

Mumbai | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन सुरू झालेल्या मुंबई हिंदी महासभेने देशात तसेच जगभरात हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली असून संस्थेचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न-नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

कांदा प्रश्न पुन्हा पेटणार? शेतकरी विरोधी सरकारचा निर्णय पुन्हा शेतकऱ्यांच्या मुळावर
मुंबई हिंदी सभेची राष्ट्रीय हिंदी संगोष्टी आणि शिबिराचे उद्घाटन आज बांद्रा, मुंबई येथे मुंबई हिंदी सभेचे अध्यक्ष तथा राज्याचे अन्न-नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रिय हिंदी संचालनालयाचे संचालक सुनिल कुलकर्णी, भारतीय हिंदी संस्था संघाचे अध्यक्ष अजय पाटील, हिंदी महासभेचे प्रधान सचिव सूर्यकांत नागवेकर, उपकुलपती विजय परदेशी, शिबिरातील वक्ते डॉ.चंद्रदेव कवडे, एस. आर. गावडे, मनप्रीत कौर, डॉ. वंदना पावसकर, हेमंत सावंत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Big News | मराठा समाज आक्रमक; दौंडमध्ये मराठा आंदोलनकांनी राऊतांना अडवलं!

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, भारत हा विविध संस्कृती आणि वैविध्यपूर्ण भाषांचा हा देश आहे. मात्र भारतीय लोक त्याचा इंग्रजीतही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. परंतु, इथे प्रत्येक गावाची आणि प्रांताची भाषा किंवा बोली वेगळी आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा आहे. महाराष्ट्रात मराठी आहे, गुजरातमध्ये गुजराती आहे, कर्नाटकात कन्नड आहे. देशातील जवळपास प्रत्येकाला किमान दोन भाषा अवगत आहेतच. भारत हा जगातील सर्वात जुन्या भाषांचा देश आहे यामध्ये “तमिळ” आणि “संस्कृत” भाषांचा समावेश आहे. या सर्व भाषांमध्ये, हिंदी ही भारतामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, मुंबई हिंदी सभेच्या माझगाव केंद्रातून आणि त्यावेळच्या हिंदी सेवकांकडून सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सरकारी व्यासपीठांवर प्रभावी हिंदी बोलण्याचे ज्ञान मला मिळाले. यासाठी मी माझ्या गुरुवर्यांचे कर्तबगार शिक्षिका हन्नाबहन पेणकर जी यांची सदैव ऋणी राहीन असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here