वैभव पगार- प्रतिनिधी: दिंडोरी | पीएम श्रीस्कूल जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालायाअंतर्गत चालविल्या जात असलेल्या व नवोदय विद्यालय समिती नवी दिल्ली द्वारा संचालित खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता २३ सप्टेंबर २०२४ ही आहे.
Dindori | परिवर्तन आघाडीमुळे प्रस्थापित पक्षांच्या पोटात गोळा – प्रा. संदीप जगताप
हे विद्यार्थी आहेत परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी पात्र
जे विध्यार्थी/विध्यार्थिनी शैक्षणिक सत्र २०२४- २५ मध्ये नाशिक जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहेत व सलग इयत्ता तिसरी चौथी अनुक्रमे २०२२-२३, २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात उत्तीर्ण झालेले आहे. त्यांचे पालक नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. तसेच विध्यार्थ्यांचा/ विध्यार्थिनींचा जन्म १ मे २०१३ ते ३१ जुलै २०१५ या दरम्यान झालेला आहे. असे विध्यार्थी/विध्यार्थिनी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहे.
या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधीची संपूर्ण माहिती नवोदय विद्यालय समिती नवी दिल्लीच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही प्रवेश चाचणी परीक्षा दिनांक १८ जानेवारी, २०२५ रोजी नाशिक जिल्ह्यातील ४० परीक्षा केंद्रावर होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया समन्वयक श्री. श्याम मदनकर ९२३६१५३१९ आणि श्री. आर. के. पराडे यांच्याशी ९८२०८७९७१० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य श्री. एस. व्ही स्वामी यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम