वैभव पगार – प्रतिनिधी : म्हेळूस्के | मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात पालक शिक्षक मेळावा घेऊन पालक शिक्षक संघ समितीची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक स्कुल कमिटी अध्यक्ष मा.श्री सुरेश सोमवंशी होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मविप्र समाज संस्थेचे दिंडोरी-पेठचे संचालक प्रवीण जाधव, प्रमुख अतिथी उच्च माध्यमिक स्कुल कमिटी अध्यक्ष श्री. विजय जाधव, अभिनव बालविकास मंदिर अध्यक्ष रामराव पाटील, उच्च माध्यमिक स्कूल कमिटी सदस्य श्री.दिपक जाधव उपस्थित होते.
व्यासपीठावर विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य रामनाथ गडाख, ज्येष्ठ शिक्षक प्रदीप जाधव सर, ज्ञानेश्वर भवर यांच्यासह मोठ्या संख्येने माता व पालक देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामनाथ गडाख यांनी केले. पालक शिक्षक संघ समिती स्थापन करण्यामागचा उद्देश तसेच शालेय शिस्त, विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा, गणवेश इ. बाबत त्यांनी पालकांशी चर्चा केली.
Dindori | शिक्षणासोबत संस्काराचे मूल्य रुजवणारी म्हेळूस्केची स्वामी विवेकानंद अभ्यासिका
यावेळी पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून आपल्या पाल्यांच्या समस्या मांडल्या तसेच विद्यालयीन गुणवत्तेचे देखील कौतुक केले. शिक्षक मनोगत प्रा.विशाल खुळे यांनी केले. विद्यालयीन प्रगतीचा लेखाजोखा मांडला. तसेच विद्यालयाच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला. संचालक प्रविण जाधव यांनी विद्यालयीन कामकाजात पालकांचा सहभाग व सहकार्य वाढवण्याचे आव्हान केले. उपस्थित पालकांच्या एकमताने पालक शिक्षक संघ कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षांच्या वतीने प्रदिप जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून नवनिर्वाचित कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक असतात. तर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष म्हणून दत्तात्रय थोरात, सचिवपदी विशाल खुळे तर उपसचिव पदी भारत घुमरे यांची निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. सुत्रसंचालन प्रा.चौधरी स्नेहल यांनी केले तर आभार प्रा.ढिकले अर्चना यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.कावेरी पाटील, प्रा.एकनाथ भोये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली व सहकार्य केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम