Deola | माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस सोमवारी दि.५ रोजी विविध सामजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्रध्दा फाउंडेशन व जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या वतीने वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील वृद्धाश्रमात फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यातील माळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड युवा मंच जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते दावल भदाणे आदींसह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम