
देवळा ; देवळा वाखारी रोडवर अवैद्य गुटखा वाहतूक करणारे वाहन रविवारी दि १६ रोजी दुपारी दीड वाजता देवळा पोलिसांनी मुद्देमाला सह जप्त केले असून , आरोपी प्रशांत आनंदा वाघ( वय ३५) , व्यवसाय ड्रायव्हर, रा. मोतीनगर, विठेवाडी रोड,ता देवळा याला ताब्यात घेण्यात आले आहे . या घटनेचा देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कारवाईने अवैद्य रित्या गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .

येथे अशा प्रकारे गुटखा जप्तीची दोन महिन्यांत ही दुसरी मोठी कारवाई देवळा पोलिसांनी केली आहे . याबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील आरोपींनी राज्यात गुटखा वितरण व साठा वाहतूकिला प्रतिबंधित असतांना गुजरात राज्यातील वघई येथुन विक्रीच्या उददेशाने गुटखा जवळ बाळगुन तो पिकअप वाहनातून देवळा वाखारी रस्त्यावर विक्रीसाठी घेऊन जात असतानाची खबर मिळताच पोलिसांनी पाठलाग करून वाहन जप्त केले .
देवळा बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी “पत्रकारांनीच कसले कंबर”
यात एक राखाडी रंगाच्या लहान खोक्यात V – 1- BIG TOBACCO नावाचे एकुण १०० लहान पाकीट, प्रत्येक पाकीटात १० पाउच, प्रत्येक पाकीटाची किंमत ३०/- रू प्रत्येकी असे एकुण १० राखाडी रंगाचे लहान खोके , एक राखाडी रंगाचे मोठे खोके त्यात Vimal PAN MASALA नावाचे हिरव्या रंगाचे एकुण १०० पाकीट, प्रत्येक पाकीटात १० पाउच, प्रत्येक पाकीटाची किंमत ४७०/- रू प्रत्येकी असे एकुण १० राखाडी रंगाचे मोठे खोके, एक पांढ-या रंगाची प्लॅस्टीकची गोणी त्यावर काळया रंगाचा पटटा असलेल्या गोणीत ४ छोटया पांढ-या रंगाच्या प्लॅस्टीकच्या गोण्या, प्रत्येक गोणीत V – 1- TOBACCO नावाचे ५२ पाकीट, प्रत्येक पाकीटात २२ पाउच, प्रत्येक पाकीटाची किंमत ३३ रू प्रत्येकी असे एकुण १० पांढ-या रंगाच्या प्लॅस्टीक च्या गोण्या एक राखाडी रंगाच्या मोठया गोणीत १० पांढ-या रंगाच्या लहान प्लॅस्टीकच्या गोण्या, प्रत्येक गोणीत विमल पान मसाला नावाच्या नारंगी रंगाचे २२ पाकीट, प्रत्येक पाकीटात ११ पाउच .अशा २० मोठया गोण्या , एक निळया रंगाच्या गोणीत १० प्लॅस्टीक पिशव्या,
V-1- TOBACCO नावाचे २२ पाकीट, प्रत्येक पाकीटात ११ पाउच, अशा एकुण १० मोठया गोण्या असा विविध प्रकारचा अंदाजे १० , ६५, २४० रुपये किंमतीचा गुटखा , पांढ-या रंगाची महिंद्रा कंपनीची पिकअप क्रमांक MH -15-GV-8793 अंदाजे किंमत ८,००,०००/- रुपये असा एकुण १८,६५,२४० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या घटनेची एकच खळबळ उडाली असून ,अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे ,ज्योती गोसावी ,संदीप चौधरी सहकारी करीत आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम