देवळा बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी “पत्रकारांनीच कसले कंबर”

0
1
देवळा : येथील बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या सहविचार बैठकीत मनोगत व्यक्त करताना भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, समवेत योगेश आहेर, पंडितराव निकम आदी (छाया - सोमनाथ जगताप)

सोमनाथ जगताप
देवळा : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार की दोन पॅनेलमध्ये लढली जाणार असा संभ्रम कायम असताना रविवार (दि.१६) रोजी देवळा तालुका पत्रकार संघाने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व उमेदवारांना एकत्रित आणत निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सहविचार बैठक घेतली. बाजार समितीच्या हितासाठी अन विकासासाठी होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा अनेकांनी यावेळी व्यक्त केल्याने याबाबत समिती स्थापन करून निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्वाधिकार सदर समितीकडे देण्यात आले.

देवळा : येथील बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या सहविचार बैठकीत मनोगत व्यक्त करताना भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, समवेत योगेश आहेर, पंडितराव निकम आदी (छाया - सोमनाथ जगताप)
देवळा : येथील बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या सहविचार बैठकीत मनोगत व्यक्त करताना भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, समवेत योगेश आहेर, पंडितराव निकम आदी (छाया – सोमनाथ जगताप)

यामुळे देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याची वाटचाल सुरू झाली आहे. येथील बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक २८ एप्रिल रोजी होत असून १२९ उमेदवारी अर्ज वैध आहेत. माघारीसाठी अवघे चार दिवस उरले असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देवळा तालुका पत्रकार संघाने येथील विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन करत याबाबत चर्चा घडवून आणली. ज्येष्ठ पत्रकार नितीन शेवाळकर यांनी प्रास्ताविक करत निवडणूक बिनविरोध होण्यामागची भूमिका मांडली. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व उमेदवारांनी आपापली मते मांडत निवडणूक बिनविरोध करण्यास हरकत नसून त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली.
Deola Bajar sameeti election: दादा ‘वस्त्रहरण’ झाले असेल तर तालुक्याकडे लक्ष द्या, जबाबदारीपासून पळ काढू नका
या बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, मविप्रचे संचालक विजय पगार, माजी संचालक डॉ.व्ही.एम.निकम, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पंडितराव निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, समन्वयक कुबेर जाधव, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, खामखेड्याचे युवा शेतकरी गणेश शेवाळे, भऊरचे दीपक पवार, डोंगरगावचे माजी सरपंच दयाराम सावंत, रामराव आहेर पतसंस्थेचे चेअरमन विनोद शिंदे, खालपचे अविनाश सूर्यवंशी, धर्मा निकम, निंबोळा, शशिकांत निकम , विठेवाडी, काकाजी पवार ,भऊर, पर्वत गवळी ,वाजगाव आदींनी निवडणूक बिनविरोध कशी व्हावी त्याबाबतच्या अपेक्षा आणि भावना व्यक्त केल्या.

या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने समिती स्थापन करण्याबाबत एकमत झाले. त्यासाठी सर्व उमेदवारांच्या माघारी एकत्रित जमा करणे आणि योग्य नियम-निकष लावत निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्वाधिकार सदर समितीकडे देण्याचे ठरले. यावेळी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नामनिर्देशन पत्र दाखल केलेले उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार संघाचे सोमनाथ जगताप, विनोद देवरे, राजपाल आहिरे, संजय देवरे, पंडित पाठक, बाबा पवार, महेश सोनकुळे, वैभव पवार, भिला आहेर, जगदीश निकम यांनी संयोजन केले तर पत्रकार संघाचे अध्यक्ष मोठाभाऊ पगार यांनी सूत्रसंचालन केले.

सन १९९९ साली तत्कालीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून स्वतंत्र देवळा बाजार समिती निर्माण व्हावी यासाठी देवळा पत्रकार संघाने तत्कालीन मंत्री डॉ.दौलतराव आहेर, ए.टी. पवार, आमदार शांतारामतात्या आहेर यांचेसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्रित आणत यशस्वी प्रयत्न केले होते. त्याच धर्तीवर आजची बैठक घेत पहिले पाऊल टाकण्यात आले.

“निवडणूक बिनविरोध होणार असेल तर पहिली माघार माझी असेन. मात्र त्यासाठी सर्वसमावेशक निर्णय आणि योग्य ते निकष लावत बिनविरोध प्रक्रिया राबवायला हवी. यामुळे बिनविरोध निवडीचा एक आदर्श निर्माण होऊन बाजार समितीचे हित साधले जाईल.”
केदा आहेर, माजी सभापती, बाजार समिती देवळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here