Skip to content

Deola Bajar sameeti election: दादा ‘वस्त्रहरण’ झाले असेल तर तालुक्याकडे लक्ष द्या, जबाबदारीपासून पळ काढू नका


Deola Bajar sameeti election: तालुक्यात बाजार समितीचे रान पेटलेले असताना तालुक्यातील कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारे उदयकुमार आहेर मात्र सद्या शांत असल्याने बाजार समिती निवडणुकीत रंग भरले नाहीत अशी चर्चा आहे. विरोधकांच्या मते मॅनेज राजकारणी तथा राज्याचे नेते उदयकुमार आहेर नगरपंचायत निवडणुक पासून राजकारणातून सन्यास घेत नाशिकला स्थायिक झाले. यामुळे निवडणुकीत हुंकार त्यांना भरता आला नाही. तालुक्यात महत्वाचे मुद्दे पेटत असताना ते मात्र पुण्यात “वस्त्रहरण” करत होते. अर्थात नगरपंचायत निवडणुकीत त्यांचे झालेले वस्त्रहरण विसरून त्यांनी आपली कला जपत सहभाग घेतला हे देखील महत्वाचे. ( Deola Bajar sameeti election)

देवळा तालुक्यांत विरोधकांची पोकळी निर्माण झाली का ? आपले मत नोंदवा

👇🏻

 

उदयकुमार आहेर हे राज्यस्तरीय नेते आहेत असे अनेकांनी बघितले असेल, कारण त्यांच्याकडे प्रदेश प्रवक्ते, प्रदेशाध्यक्ष असे पद होती. राज्याचे पद असले तरी मात्र त्यांची होम ग्राउंड वर अर्थात देवळा तालुक्यात झालेली वाताहात आपण सर्वांनी बघितली. नगरपंचायत निवडणुकीत दोन प्रभागांमध्ये त्यांच्या होम मिनिस्टरांचा झालेला पराभव, या निवडणुकीच्या सभांमध्ये जनतेला विना पैशाचे मतदान करा असे आवाहन केले. नवोदय क्रांती नावाचे कार्ड त्यांनी या निवडणुकीत वापरले मात्र त्याचा फारसा काही प्रभाव जनतेवर पाडता आला नाही. ही माझी शेवटची निवडणूक आहे अशी भावनिक साद देखील घातली. या निवडणुकीत जिंकलो किंवा पडलो तर ही निवडणूक शेवटची असेल अशी भावनिक साद घालत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी भावनिक सादेला “टाटा बाय – बाय” केले. आणि उदयकुमार आहेरांचे राजकारण संपुष्टात आले. केलेल्या घोषणेप्रमाणे उदयकुमार देवळा सोडतात का याकडे विरोधकांचे देखील लक्ष लागून होते. नेहमीच आपल्या वक्तव्यावर धिंगाणा घालणारे उदयकुमार आहेर यावेळी आपल्या वक्तव्यावर ठाम राहत पराभवानंतर नाशिकला स्थिरावले. (Deola Bajar sameeti election)

नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांना धारेवर धरणारे आरोपांच्या फैरीतून घायाळ करणारे उदयकुमार देवळ्याच्या राजकारणापासून अलिप्त झाले. यानंतर चर्चा सुरू झाले उदयकुमार आहेर केलेल्या घोषणेमुळे दूर झाले की राजकीय सेटलमेंट होऊन नाशिकला स्थिर झाले. नाशिक सारख्या शहरात उदयकुमार अचानक गेले, मै तो फकीर हू म्हणणारे अचानक शहरात उदरनिर्वाह कसा काय करू लागले? याकडे देखील सर्वांचे लक्ष वेधले गेले.

सध्या देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध होणार की पॅनल होणार याकडे तालुका वासियांचे लक्ष आहे. देवळा तालुक्यात विरोधकाला बदनाम करून राजकारणातून बाजूला केले जाते असा देखील एक मतप्रवाह आहे. मात्र आपल्या भूमिका योग्य असतील तर जनतेला पटवून देण्यात कुठेतरी उदयकुमार कमी पडले का ? की आपली जबाबदारी झटकून पळ काढण्यासाठी हे विरोधकांना दोषी धरले हे देखील महत्वाचे आहे. आपल्या जबाबदारीपासून पळ काढणारे तालुक्याने दोन नेते बघितले त्यातले अरुण आहेर आणि उदयकुमार आहेर यांनी आपला कर्तव्यापासून दूर जात पैसे कमावण्यात धन्यता मानली.

जनतेला तालुक्यात विरोध हवा आहे. त्यासाठी खमक्या नेतृत्वाची गरज आहे. रविवारी होणारी बैठक ही माघारीची की सेटल मेंटची हे जनतेला ठरवायचे आहे. शेतकऱ्यांच्या संस्थेत शेतकरी सोडून तालुक्याचे पुढारी सत्ता उपभोगत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे. आ. डॉ. राहुल आहेर साध्या भोळ्या चेहऱ्या आड सेफ खेळी खेळताय तालुका केदा नाना सांभाळताय असे चित्र निर्माण केले. आमदार जनतेत जात नाही मात्र आमदारच गोड आहे. अशी प्रतिमा निर्माण झाली. यात नाना मात्र काही अंशी काही प्रकरणात बदनाम झाले. आमदार उजळ माथ्याने सामोरे जातात. इतर विरोधक जेव्हा तोडका मोडका विरोध करतात तेव्हा टार्गेट आमदार नाही तर नाना असता. यामुळे येत्या निवडणुकीत नाना काय भूमिका घेता याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. मात्र तालुक्यात विरोधकांची गरज आहे हे देखील महत्वाचे अन्यथा जनतेला गृहीत धरले जाईल हे सत्य नाकारून चालणार नाही.

…..तर पहिली माघार माझी; नानांच्या गुग्लीने सस्पेन्स वाढला


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!