देवळ्याचे राजकारण कुठल्या दिशेला ?; ‘सब मिले जुले हैं ?’; आमदार सोज्वळ प्रतिमा बनविण्यात दंग

0
1

देवळा: काल देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी भूमिका घेत बैठक घडवून आणली. मात्र यानिमित्ताने एक प्रश्न जनतेच्या मनात उभा राहील तसे अनेक कॉल msg ‘पॉइंट नाऊ’ च्या संपर्क क्रमांकावर आले त्यात जनतेचे म्हणणे आहे. पत्रकारांनी खरच असे बैठका घडवून बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करावेत का ? वसाका बंद पडून तो खाजगी व्यक्तीला चालवण्यासाठी दिला यांदर्भात का पत्रकारांनी बैठका लावल्या नाहीत. साध्या पतसंस्थेच्या निवडणुका लागल्या तेव्हा पत्रकार कुठ होते ?. नगरपंचायत निवडणुक वेळी पत्रकार कुठ होते ? हे सर्व प्रश्न जनतेने विचारले यामुळे ते मांडणे गरजेचे आहे.

देवळा बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी “पत्रकारांनीच कसले कंबर”

तालुक्यातील आमदार राहुल आहेर अजून किती दिवस केदा आहेर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणार, आपली प्रतिमा सोज्वळ ठेवण्याच्या नादात त्यांच्याकडून आपलाच भाऊ ज्याने आपल्यासाठी दोन वेळा विधानसभेचा त्याग केला, ते बदनाम तर होत नाहीना याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. स्थानिक निवडणुक आल्या की जबाबदारी नाना यांच्यावर देवून तेच सर्व बघताय मी काही लक्ष घालत नाही. असे सांगून ज्यांना तिकीट मिळाले नाही त्यांच्याशी गोलमगोल राहण्याचे राजकारण आमदार महोदय करताय. मात्र हे त्यांचे सोज्वळ राजकारण नानांच्या लक्षात आले नाही हे देखील विशेष. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी ना कधी MIDC ची मागणी केली ना कधी शेतकरी हिताची भूमिका घेत त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरले त्यांच्या या सोयीच्या राजकारणाने नेमक काय धोरण आहे. हे येणारा काळच सांगेल. विरोधकांच्या मनात देखील आमदार हे जवळचेच आहेत. याकडे नानांनी देखील लक्ष देणं गरजेचे आहे. रामाची सेवा करता करता लक्ष्मण वनवासात ना जावो इतकंच.

काल बैठक झाली मात्र यात अनेक महत्वाचे मुद्दे दुर्लक्षित झाले. यात गेले 10 वर्ष जे मुद्दे गाजले त्यांच्याबद्दल चकार शब्द देखील काढला नाही. फक्त कुणाची किती ताकद यावर लक्ष वेधण्यात आले. जनतेला वेड्यात काढण्याचे धोरण राजकिय नेत्यांसह पत्रकार किंवा प्रतिष्ठित व्यक्तींनी करून नये इतकीच माफक अपेक्षा आहे. या बातमी मुळे अनेक लोक ‘पॉइंट नाऊ’ला शिव्या घालण्याचे काम करतील मात्र शिव्या घालण्या आधी आत्मपरीक्षण करावे इतकीच नम्र विनंती आहे.

हे मॅनेज नाहीत मग गप्प का ?

देवळा बाजार समितीच्या स्थापनेच्या आधीपासून बाजार समितीतील विविध मुद्द्यांना हात घालणारे नेता म्हणून उदयकुमार आहेर यांचे नेतृत्व देवळा तालुक्यात उदयास आले. कांद्याचे रोख पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठीचा त्यांचा लढा त्यावेळी जिल्हा नव्हे तर राज्यभर गाजला. देवळा बाजार समितीतील झालेल्या अनेक घोटाळ्यांचे मुद्दे बाहेर काढणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे समीकरणच उदयकुमार आहेर यांच्या नावासोबत जोडले गेले.

व्यापारी पळून गेला उदयकुमारांनी आवाज उठवला अन् शांत झाले

देवळा बाजार समितीत शेतकऱ्यांचा कांद्याचे 60 लाख रुपये बुडवून व्यापारी पळून गेला. त्यावेळी बाजार समितीच्या एका संचालकाचा त्याच्यासोबत पार्टनरशिप मध्ये व्यवहार होता. शेतकऱ्यांचे 60 लाख रुपये शेतकऱ्यांना परत मिळावेत यासाठी उदयकुमार आहेर यांनी अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या बाजूने सहकारातील अधिकाऱ्यांकडे लढा दिला. पण, आजपर्यंत ना त्या व्यापाऱ्याला अटक झाली, ना त्या संचालकावर कारवाई आणि ना शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले. उदय कुमार यांनी हा मुद्दा अर्ध्यात सोडल्याची चर्चा तेव्हापासूनच आजही सुरू आहे.

विना टेंडर भिंतींचे काम आवाज उठवला अन् पुन्हा गप्प

देवळा बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डात संरक्षण भिंतीचे काम विना टेंडर सुरू करण्यात आले होते. त्याविषयी उदयकुमार आहेर यांनी त्या दीड कोटी रुपयांच्या कामांच्या चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांकडून मिळविले होते. पण, त्या चौकशीची पुढे काय झाले??आणि उदयकुमार त्यावर गप्प का झालेत?? हे कोडे आजही सुटलेले नाही.

गाळे परस्पर विकले आरोप केले गप्प बसले

देवळा बाजार समिती अस्तित्वात येण्याच्या आधी कळवण रोडला समांतर व्यापारी गाळे बाजार समितीने बांधले आणि काही व्यापाऱ्यांना ते भाड्याने दिलेत. भाड्याने दिलेले गाळे परस्पर बाजार समितीच्या परवानगी विना मोठ्या रकमांना व्यापाऱ्यांनी दुसऱ्यांना विकून टाकले बाजार समितीला मात्र एक रुपयाही मिळाला नाही. यावर उदयकुमार आहेर यांनी आवाज उठवला. मात्र, तो आवाज नंतर बंद का झाला?? याचे उत्तर ना कधी उदयदादांनी दिले ना केदानानांनी…

NA न करता बांधकाम कॉम्प्लेक्स अनधिकृत दादा परत मैदानात अन् पुन्हा शांत

देवळा बाजार समितीची निर्मिती झाल्यानंतर देखील सदरची जमीन अकृषक करण्यात आलेली नाही. म्हणजेच N.A. करण्यात आलेली नाही. झालेले दोन्ही कॉम्प्लेक्स अनधिकृत असल्याचे उदयदादांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून दिले. त्याविषयीची चौकशी लागली. मात्र त्याचे नंतर काय झाले? याचे उत्तर आजही शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

असे एक ना अनेक होते. जी मुद्दे उदयकुमार आहेर यांनी हातात घेतले आणि अर्धवट सोडून दिलेत. यामुळे ते राजकीय दृष्ट्या नेहमीच संशयात सापडले गेले. गेल्या वर्षभरापासून तर त्यांनी देवळा तालुक्याच्या राजकारणाविषयी बोलणेच बंद केले आहे. आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले पाहिजे, जनतेच्या मनातील संभ्रम दूर केला पाहिजे नाहीतर तो इतिहास होतो. याची जाणीव या निमित्ताने आम्ही उदयकुमार आहेर यांना करून देतोय. आणि आरोप होतात त्यानुसार तुम्ही खरच मॅनेज असाल तर तालुक्यांतील आजपर्यंतचे सर्वात मोठे विश्वास घातकी नेते म्हणून आपली ओळख भविष्यात कायम राहील.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here