Deola | देवळा येथील नीमगल्ली गणेश मित्रमंडळाच्या वतीने अथर्वशीर्ष पठण; शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

0
21
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: Deola | देवळा येथील नीमगल्ली गणेश मित्रमंडळाने सामाजिक, सांस्कृतिक, महिलांसाठी खेळांचे उपक्रम राबवून गणेश उत्सवाच्या आठव्या दिवशी गणेश अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. या पठणासाठी पाचशेहुन अधिक महिला भाविकांनी सहभाग नोंदवला होता.

Deola | देवळा नगरपंचायत हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी ढोरजकर

देवळा शहरात सर्वत्र शांततेत गणेश उत्सव साजरा करण्यात आला. त्यात सुभाष रोड मित्रमंडळाने मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबर खेळ पैठणीचा कार्यक्रम घेऊन गणेशाचा जागर केला असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिल्याने यात महिला वर्गाने प्रचंड सहभाग नोंदवला होता. मंडळाने १४ फुटी गणेश मूर्ती स्थापना केल्याने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. लहान व मोठ्या विद्यार्थ्यांसाठी देखील विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

Deola | देवळा तालुक्यातील पाणी प्रश्नासह इतर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील – खा. भगरे

मंगळवारी विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

गणेशाची मूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी सज्ज केली असून, विविध मार्गावरून जाणाऱ्या मिरवणुकासाठी येणारे अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी शांततेत श्रींचे विसर्जन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here