Deola | देवळा नगरपंचायत हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी ढोरजकर

0
20
Deola
Deola

Deola | महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रक्कम रु. ३०,०००/- इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश असेल. तरी सदर योजना देवळा नगरपंचायत हद्दीत पात्र लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असून पात्र लाभार्थ्यानी नगरपंचायत अधिकारी/कर्मचारी यांचेकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा व योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी केले आहे.

Pilgrimage Scheme | ज्येष्ठ नगरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली नव्या योजनेची घोषणा; बघा काय आहे योजना..?

पात्रता निकष

  1. ६० वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेले महाराष्ट्राचे नागरीक
  2.  रुपये २.५ लक्षपेक्षा कमी उत्पन्न
  3. कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावा, सरकारी नोकरीत नसावा, चारचाकी वाहन नसावे
  4. प्रवासासाठी सक्षम असावा

आवश्यक कागदपत्रे

  1. अर्ज
  2. आधारकार्ड/ मतदानकार्ड
  3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
  4. जन्म दाखला
  5. उत्पन्न दाखला
  6. स्वयं घोषणापत्र
  7. बँक पासबुक (झेरॉक्स)
  8. वैदयकिय प्रमाणपत्र
  9. विहीत नमुन्यातील हमीपत्र

(याकामी नोडल अधिकारी म्हणून जनार्दन येवले यांची नियुक्ती केलेली असून, सदर योजनेसंदर्भात काही अडचण असल्यास आशिष महाजन, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संदर्भ साधावा.)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here