सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या सहकार्याने तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला संपन्न झाली. समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ म्हणाले की, “आपण इतरांशी संवाद-संबंध कसे ठेवतो, ताण-तणाव हाताळताना इतरांच्या भावनिक- मानसिक- सामाजिक कल्याणाचा विचार कसा करतो, या सर्वच गोष्टींचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. मानवी वर्तनाची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. आनुवंशिकता, पर्यावरण, भूतकाळातील अनुभव, भावना आणि संज्ञानात्मक प्रक्रिया यासारख्या विविध घटकांनी आपले वर्तन प्रभावित होत असते.
Deola | खर्डे येथे “स्वच्छता हि सेवा” अभियान
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स दिल्या.
विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित शारीरिक व्यायाम, कार्यप्रवणता, विश्रांती, ध्यान, रिलॅक्ससेशन याकडे लक्ष दिले पाहिजे. मानसिक आणि भावनिक कल्याणासाठी पुरेशी झोप घ्या. मोबाईलचा अतिवापरटाळा, इतरांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष द्या, आवड दाखवा आणि योग्य प्रतिसाद द्या. इतरांचे दृष्टीकोन आणि भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, स्वतःला स्पष्टपणे आणि आदरपूर्वक व्यक्त करा. इतरांशी खुल्या आणि प्रामाणिक संवादाला प्रोत्साहन देत आदर बाळगा आणि दयाळूपणे वागा. कृती आणि वचनांमध्ये सातत्य ठेवा. विश्वासार्ह रहा. तंटे-विवाद यांना रचनात्मकपणे सामोरे जा. समस्या वाढवण्याऐवजी त्यातून मार्ग कसा निघेल हे शोधा. इतरांच्या प्रयत्नांबद्दल आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. परिस्थितींशी जुळवून घेऊन स्वतःच्या आणि इतरांच्या सीमांचा आदर करा, नातेसंबंध जपा… हे सर्व जमले म्हणजे आपण मानसिकदृष्ट्या सक्षम झालो. हास्य हे सर्व रोगांवरचे औषध आहे. सतत हसत रहा… अशा काही टिप्सही प्राचार्य रसाळ यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
Deola | कणकापूर विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सम्पन्न
व्याख्यानमालीला जवळजवळ 300 विद्यार्थ्यांचा दररोज सहभाग होता
या व्याख्यानमालेत ‘रसास्वाद’ या विषयावर राजाराम मुंगसे यांचे तर हास्ययोग आणि आरोग्य या विषयावर प्रात्यक्षिकांसह डॉ. सुषमा दुगड यांनी उपस्थित विद्यार्थी प्राध्यापकांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आणि ज्ञानप्रसारक वृत्तीचा मागोवा घेतला. प्रमुख अतिथी म्हणून देवळा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्रोफेसर डॉ. मालती आहेर उपस्थित होत्या. या व्याख्यानमालेत उपप्राचार्य डॉ. डी. के आहेर यांच्यासह विविध ज्ञानशाखांचे प्राध्यापक आणि जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी दररोज सहभाग घेतला. बहि:शाल केंद्रकार्यवाह जयवंत भदाणे यांनी व्याख्यानमालेची भूमिका मांडली व अतिथी परिचय दिला. प्रा. राकेश घोडे, प्रा. रवींद्र पगार व प्रा. हर्षाली निकम यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम