सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील सुराणा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमणलाल सुराणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेच्या डॉ. रेशमा सुराणा चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत वाजगांव ता. देवळा येथील निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील २५० विद्यार्थ्यांना गादी वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन प्रदीप सुराणा यांनी दिली.
Deola | ‘वस्तीशाळा ते मॉडेल’ स्कुल करणाऱ्या शिक्षकाच्या कार्याचा राज्य पुरस्काराने गौरव.
वाजगांव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थी चटईवर झोपत होते. सामाजिक बांधिलकी जोपासत पतसंस्थेने या विद्यार्थ्यांना गादीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. रमणलाल सुराणा यांनी सांगितले की, “आपण ह्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. ह्या उद्देशाने संस्था कार्यरत असते.” यावेळी आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षक व कर्मचारी वर्गास डॉ. सुराणा यांनी त्यांच्या स्वखर्चाने मिठाई तसेच ३० किलो ड्राय फ्रुटचे वाटप केले.
Deola | देवळ्यात बिबट्याची दहशत; घरातून बाहेर पडणे झाले मुश्किल
Deola | डॉ. रमणलाल सुराणांचे मुख्याध्यापकांहस्ते सत्कार
विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून मुख्यध्यापक सुनिल जाधव यांनी डॉ. रमणलाल सुराणा यांचा सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष संजय कानडे, संचालक रमेश संकलेचा, ईश्वर सुराणा, राजेंद्र सुराणा, निलेश कांकरिया, अशोक गुळेचा, सुनिल बुरड, मनोज ठोलीया, संतोष लोढा, सुभाष सोनवणे, जनार्दन शिवदे, संचालिका सुरेखा सुराणा, शोभा सूर्यवंशी आदींसह प्रविणकुमार सुराणा, रोशन सूर्यवंशी व कर्मचारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम