BJP | भाजपला मोठा फटका; बावनकुळेंच्या विधानाने चर्चांना उधान

0
51
#image_title

BJP : सध्या राजकीय वर्तुळात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. तर नाराज असलेल्या नेत्यांची इतर पक्षांमध्ये इन्कमिंग-आउटगोइंग सुरूच आहे. यामध्येच नुकतेच महायुतीत प्रवेश केलेले हसनमुश्रीफ यांच्यामुळे भाजपचे कोल्हापूर मधील कागल मतदारसंघाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफांच्या युतीत येण्याने नाराजी व्यक्त करत युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असून येत्या निवडणुकीत मुश्रीफांविरुद्ध तुतारी चिन्हावर लढणार आहेत हे आता निश्चित झाले आहे. तर यानंतर आता घाटगेंप्रमाणेच भाजपमध्ये अजून 24 नेते अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर 4 ते 5 जण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.

BJP | भाजपच्या दोन आमदारांमध्ये वादाची ठिणगी; भाजपची डोकेदुखी वाढणार

BJP | चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलाखतीत केले मोठे विधान

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी “भाजपमध्ये सध्या असे काही नेते आहेत जे अजित पवारांच्या उमेदवारांविरुद्ध लढू शकतात. त्यामुळे आता या 24 जणांना आपली पुढची वाटचाल कशी राहील याबाबत चिंता आहे, त्यामुळे थोडीफार अस्वस्थता आहे. त्याचबरोबर 4 ते 5 भाजप नेते शरद पवारांकडे जातील पण तिकडे तुतारी लावणारे खूप जण आहेत. असे विधान त्यांच्याकडून करण्यात आले.

तसेच “नाराज असलेल्या प्रत्येकाशी आमची बोलणी सुरू असून हर्षवर्धन पाटलांची देवेंद्र फडणवीसांनी खूप वेळा चर्चा केली आहे. समरजीत घाटगेंबरोबरही आम्ही चर्चा केली. त्यांना थांबवण्याचा उद्देश नव्हता कारण त्यांना ही विधानसभेची निवडणूक लढवायचीच आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला. जेवढे प्रभावी नेतृत्व पक्षात घेतले जाते, तेवढा पक्ष वाढत जातो. भाजपात जितके इनकमिंग झाले त्या ठिकाणी तितके प्रबळ उमेदवार नव्हते. मागे हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र ते तिथे पराभूत झाले. त्यामुळे सध्या महायुतीत परिस्थिती वेगळी आहे. महायुती शिवाय ते उमेदवार झालेच नसते. असे देखील त्यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे भाजपला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

BJP vs Sharad Pawar | ‘भाजपाचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला!’; विधानसभे आधीच भाजपला मोठं खिंडार

पक्ष सांगेल ते करणारे देखील खूप आहेत-बावनकुळे

“आगामी निवडणूक लढवण्यास इच्छुक चार-पाच जण बाहेर जातील. तेव्हा त्यांच्या राजकीय आयुष्याला आम्ही ब्रेक लावणार नाही. ज्यांना निवडून येतील असा आत्मविश्वास आहे ते पक्षा बाहेर जातील. भाजपा उमेदवारी देऊ शकत नाहीये अशा प्रकरणात आम्ही कसे रोखणार. आम्ही सरकार व सरकारनंतर ज्या काही ठिकाणी ताकद द्यावी लागते ती देण्याचा प्रयत्न करतोय. केंद्रामध्ये आपले सरकार आहे तेव्हा तिथे काही व्यवस्थित सामावून घेता येते का असे सांगून त्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतोय. तर तिकीट दिले नाही तरी घाई नाही असेही बरेच जण आहेत. त्याचबरोबर पक्ष सांगेल ते करायला तयार असणाऱ्यांची यादीही मोठी आहे.” असेही ते म्हणाले.(BJP)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here