BJP : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपमधील अंतरकलह पुन्हा-पुन्हा उफाळून येतानाचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. भाजपाचे नवी मुंबईमधील दोन आमदारांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असून बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्यामधील राजकीय संघर्ष दिसू लागला आहे. आमदार मंदा मात्रे यांनी नाईकांना त्यांनी केलेल्या घोटाळ्याची फाईल बाहेर काढेन. असं म्हणत इशारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा ताप वाढणार असल्याचे दिसून येते आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारींचे जोरदार वातावरण असताना नवी मुंबईत भाजपच्या दोन आमदारांमध्ये पडलेल्या वादाच्या ठिणगीमुळे भाजपचा ताप वाढण्याची शक्यता आहे.
BJP vs Sharad Pawar | ‘भाजपाचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला!’; विधानसभे आधीच भाजपला मोठं खिंडार
BJP | काय म्हणाल्या मंदा म्हात्रे
नवी मुंबई येथे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदा मात्रे यांनी आमदार गणेश नाईक यांना नाव न घेत इशारा दिल्याचे दिसून आले. म्हात्रे यांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या कामामध्ये अडथळा आणल्यास आंदोलन करणार असे सांगत घोटाळ्याची फाईल बाहेर काढेन अस म्हणतं इशारा दिला आहे. त्याचबरोबर “कोविडमधल्या सर्व फाइल्स माझ्याकडे आहेत. त्या काळात कोणत्या कंत्राटात, कोणी किती पैसे लुटले याचे रेकॉर्ड माझ्याकडे आहेत. तेव्हा माझ्या कामात आडवे याल तर भांडाफोड करेल.” असं म्हणत गणेश नाईकांचे नाव न घेत म्हात्रेंनी इशारा दिला.
BJP-Thackeray Group Rada | भाजप-ठाकरे गटात तूफान हाणामारी; पोलिसांकडून लाठीचार्ज
याआधी संदीप नाईकांवरही टिका केली होती.
यादी मंदा म्हात्रेंनी गणेश नाईकांचे सुपुत्र संदीप नाईक यांच्यावर देखील टीका केली होती. संदीप नाईक हे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्याचबरोबर ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत. संदीप नाईकांनी विधानसभा कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर “तुझ्या बापाला हरवलं आहे तू कोण आहेस?” असे म्हणत मंदा म्हात्रेंनी संदीप नाईकांना डिवचले आले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम