सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | नगरपंचायतीच्या पथविक्रेता समितीच्या एकूण ८ सदस्यांपैकी अनुसूचित जमाती, महिला प्रवर्गसाठीचे नामनिर्देशन प्राप्त न झाल्याने रिक्त राहिलेल्या उर्वरित ७ सदस्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. प्रत्येक प्रवर्गामध्ये एकच उमेदवार अर्ज प्राप्त झाल्याने दि. ३० ऑगस्ट रोजी निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यात बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे: रवींद्र उत्तम पवार (अनुसूचित जाती-सर्वसाधारण), भारती जिभाऊ आहेर (इतरमागासवर्ग-महिला राखीव), शेरान मेहमूद शेख (अल्पसंख्यांक सर्वसाधारण), राजेंद्र दशरथ कोठावदे (विकलांग व्यक्ती- सर्वसाधारण), विमल नानाजी चंदन (खुला-महिला), गणेश रंगनाथ वराडे (खुला सर्वसाधारण), नानाजी निंबा चंदन (खुला सर्वसाधारण) यांचा समावेश आहे.
Deola | सुराणा पतसंस्थेची सामाजिक बांधिलकी; वाजगांव आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना गाद्या वाटप
Deola | नागेश येवले हे निवडणूक निर्णय अधिकारी होते
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नागेश येवले मुख्याधिकारी कळवण नगरपंचायत, यांनी कामकाज पहिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा कर निरीक्षक देवळा नगरपंचायत जनार्दन येवले, आशिष महाजन, अनिल रायते, तुषार बोरसे, श्रीमती पुनम भामरे आदि उपस्थित होते.
Deola | ‘वस्तीशाळा ते मॉडेल’ स्कुल करणाऱ्या शिक्षकाच्या कार्याचा राज्य पुरस्काराने गौरव.
निवडून आलेल्या उमेदवारांना मंगळवारी दि. ३ सप्टेंबर रोजी नगरपंचायत सभागृहात मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, उपनगराध्यक्ष मनोज आहेर, नगरसेवक संभाजी आहेर, जितेंद्र आहेर, कैलास पवार, अतुल पवार, दिलीप आहेर आदींच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वाटप करून सत्कार करण्यात आला.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम