सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | “चांदवड-देवळा मतदारसंघात पाणी टंचाई, विजेची समस्या, रस्त्यांची दुरवस्था झाली असून, यासर्व समस्या सोडवण्यासाठी जनता हक्काचा माणूस या नात्याने माझ्याकडे आशेचा किरण म्हणून बघत आहे.” असे मत अपक्ष उमेदवार केदा आहेर यांनी खर्डे ता. देवळा येथे सोमवारी दि. ११ रोजी आयोजित प्रचार सभेत बोलतांना व्यक्त केले. यावेळी केदा आहेर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
Deola | वासोळ येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
“विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे”
आहेर पुढे म्हणाले की, “चांदवड-देवळा मतदारसंघात दहा वर्षे वाया गेली आहेत. यामुळे मला आता लोकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, सर्व पक्षाच्या लोकांनी समर्थन दिले आहेत, विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे, मतदारसंघात पाण्याचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत, याठिकाणी ९० टक्के शेतकरी आहेत, वीजे बरोबरच रस्ते, एज्युकेशन हब, औद्योगिक वसाहत नाही, यामुळे बेरोजगारी वाढली आहे., पूरक व्यवसाया संदर्भात आपल्या भागातली लोकप्रतिनिधींकडे व्हिजन नाही. मला यासाठी मतदारसंघात बदल घडवायचा आहे. माझ्याकडे विकास करण्याची पद्धत आहे.
आमदार झाल्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार
माझा सर्वपक्षीय मित्र परिवार आहे. माझ्या वाईट काळात मला माझ्या भावाने साथ दिली नाही, पण तुम्ही दिली. न्याय नीती पाहिजे. आमदार झाल्यावर खर्ड्यात भव्य दिव्य अशा शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा माझा मानस आहे. मी बांधावर जाऊन काम करणारा माणूस आहे. तुम्ही सर्व राजकीय हेवेदावे बाजूला सारून माझ्या सोबत आल्याने मला ऊर्जा मिळाली आहे.” असे केदा आहेर शेवटी म्हणाले.
Deola | “खर्डेकर मतदान कर” असा नारा देत आरोग्य विभागाने खर्डे गावात राबवले मतदान जनजागृती अभियान
सभेला या मंडळींनी लावली उपस्थिती
यावेळी ह. भ. प. किसन मोरे, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, मविप्र संचालक विजय पगार, जगदीश पवार, संदीप पवार, विजय जगताप, बापू देवरे, निवृत्ती घुले, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बाजार समितीच्या संचालक भाऊसाहेब पगार, दिलीप पाटील, जितेंद्र आहेर, माजी सरपंच नारायण जाधव, नारायण शंकर, कृष्णा अहिरे, बापू ह. भ. प. पुंडलिक महाराज, सरपंच अर्जुन मोहन, सुरेश जाधव, बाळासाहेब आहेर, वसंत जाधव, अनिल देवरे, मधुकर देवरे, जगन्नाथ माळी, काशिनाथ गांगुर्डे, हेमराज सोनवणे, दिलीप गवारे, भरत देवरे, बापू जाधव, कारभारी जाधव, निवृत्ती घुले आदी उपस्थित होते.प्रास्ताविक मुरलीधर भामरे यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम