Nitin Gadkari | ‘कोणत्याही माईचा लाल संविधान बदलू शकत नाही’; नितीन गडकरींचे विरोधकांच्या टिकेला प्रत्यूत्तर

0
43
#image_title

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औसा येथे भाजप महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचाराकरिता आयोजित सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी “लोकसभा निवडणुकीत, भाजपने चारशे पारचा नारा दिल्यामुळे काँग्रेसने सामान्य जनतेमध्ये भाजप बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलणार, असा खोटा संभ्रम निर्माण केला. मी कायद्याचा अभ्यासक असून कोणत्याही माईचा लाल घटनेत लिहिल्या गेलेल्या मूलभूत तत्वाला बदलू शकत नाही.” असं म्हणत काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Nitin Gadkari | भाषणा दरम्यानच गडकरी कोसळले; मात्र, तरीही पुन्हा भाषणाला उभे राहिले

गडकरींनी कॉंग्रेसवर निशाणा साधला

याउलट, “काँग्रेसनेच वेळोवेळी डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेत बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घटनेत बदल करून लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना विचारा आम्ही तुम्हाला मते का द्यावी? यांनी साठ वर्षे सत्ता भोगली. परंतु गरिबांच्या कल्याणाकरिता काहीच केले नाही. या साठ वर्षात जर काँग्रेसने सिंचनावर व्यवस्थित काम केले असते तर आज देशाच्या विविध भागात पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी झाली नसती.” असे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलत, “केंद्रीय मंत्री गडकरी यांनी काँग्रेसने नदीजोड प्रकल्प अमलात आणला असता तर नदीच्या पाण्यावरून राज्यात सुरू असलेले पाण्याचे तंटे संपले असते. पावसाचे वाहून जाणारे पाणी नदी व धरणात साठवून त्याचा शेती आणि उद्योगासाठी मोठा फायदा झाला असता. देशात हरितक्रांती झाली असती. शेतकरी सुखी झाला असता. पण असे कुठलेही धोरण काँग्रेसने राबवले नाही. गरीबी वाढत गेली, एकीकडे गरिबी हटवायचा नारा देणाऱ्या काँग्रेसनेच खरी गरीबी पोसण्याचे काम केले. आमच्या कार्यकाळात आम्ही शेतकऱ्यांना केवळ अन्नदाता केले नाही तर त्याला ऊर्जादाता केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून देशाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला.” असे म्हणत भाजपच्या विकासकामांचा पाढा वाचला.

BJP Political | वाचाळवीरांनी भाजपची डोकेदुखी वाढवली; माजी आमदाराची जीभ घसरली

“तुम्ही मत द्या निधीच मी पहातो..”

तर औशाच्या विकासाची गती वाढवायची असेल तर महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवारांना घसघशीत मतांनी निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केले. “तुम्ही महायुतीचा उमेदवार निवडून द्या. निधी देण्याचे काम मी पाहतो.” असे म्हणत नागरिकांना आश्वस्त केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, माजी मंत्री बसवराज पाटील, परीक्षित पवार, संतोष मुक्ता, किरण उटगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here