Chhagan Bhujabal | ‘मुख्यमंत्री पद दिलं असतं तर वरचढ ठरलो असतो’; शरद पवारांच्या विधानाला भुजबळांचे प्रत्यूत्तर

0
42
#image_title

Chhagan Bhujabal | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारादरम्यान, “मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष करत 2004 मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व छगन भुजबळांकडे दिले असते, तर राज्याची अवस्था चिंताजनक झाली असती.” असे विधान केले होते. यावर आता छगन भुजबळांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री केलं असतं तर वरचढ ठरलो असतो. म्हणून मला मुख्यमंत्री केले नाही.” असं म्हणत पलटवार केला आहे. तर शिवसेना फोडण्याचे चांगले काम सुद्धा शरद पवारांनी केल्याचा आरोप यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

Sharad Pawar | 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ‘या’ कारणासाठी भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही; शरद पवारांचा खुलासा

“2004 साली भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती” असा खळबळजनक दावा शरद पवारांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान केला होता. “छगन भुजबळांना नंतर तुरुंगात जावं लागलं” असे देखील शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी केलेल्या या दाव्यावरून भुजबळ यांनी आता त्यांना प्रतिउत्तर दिले असून पत्रकार परिषदेदरम्यान भुजबळांनीही अनेक खळबळ जनक दावे केले आहेत.

काय म्हणाले छगन भुजबळ?

“शरद पवार आणि सुधाकर नाईक यांच्यामध्ये मतभेद झाले. त्यांच्या टोकाचे मतभेद होते, त्यावेळी नरसिंहराव यांनी त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवले. त्यांना असं वाटत असावं की, आपण कुणालाही मुख्यमंत्री केलं तर ते आपल्या वरचढ होतील. म्हणून कोणालाच मुख्यमंत्री न केलेले बरे. त्यांनी अजित पवारांना ना आर. आर. पाटलांना किंवा छगन भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही. शरद पवार कधीपासून ज्योतिष्य पाहायला लागले? भविष्यात भुजबळांचे काय होणार आहे हे तुम्हाला कळायला लागले होते?” असं म्हणत शरद पवारांना टोला लगावला.

Chhagan Bhujabal | ‘जातीत विष पेरण्याचे काम’; प्रचाराचा नारळ फोडत भुजबळांनी घेतला विरोधकांचा समाचार

तसेच, “36 लोकांची सही झाल्यावर मी सही केली होती. पण त्या अगोदर त्या लोकांना घेऊन शिवसेना फोडण्यासाठी प्रवृत्त त्यांनी केले. यांच्या दृष्टीने चांगले काम पवार साहेबांनी केले होते. ते जर केले नसते तर कदाचित फुटाफट झालीच नसती. मी एकटा काही शिवसेना तोडू शकत नव्हतो.” असे देखील छगन भुजबळ यावेळी म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here