सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | देवळा तालुक्यातील पै. वामनानंद महाराज बहुउद्देशीय संस्था व श्रावण बाळ दिव्यांग विकास बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. दौलतराव आहेर सभागृह देवळा येथे दिव्यांग बांधवांसाठी फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Deola | देवळ्यात लाल परीचे पूजन करत साजरे झाले अनोखे लक्ष्मीपूजन
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अंकुश सोनवणे म्हणाले की, “ही संस्था सामाजिक दायित्व निभवणार असून दिव्यांग बांधवांचे भविष्य सुखकर होण्यासाठी काम करणार आहे. तालुक्यात दिव्यांग भवन उभारण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून यासाठी आपले आशीर्वाद आणि सहकार्य गरजेचे आहे. कुणाला काहीही अडचण असल्यास फोन करा तुमच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करण्यासाठी संस्था तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील” असे देखील सोनवणे यांनी आश्वासित केले.
तसेच यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण देवरे म्हणाले की, “दिव्यांग असण्याचे दुःख मी जाणून आहे. हे दुःख कमी करण्यासाठी ही संस्था आम्ही सुरू केली आहे. सरकारी योजना मिळवून देण्यासाठी तसेच दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगण्याचा आधार मिळवून देण्यासाठी आपण सर्व मिळून काम करू. दिव्यांग लोकांसाठी माझे आयुष्य समर्पित असणार आहे.”
या कार्यक्रमासाठी अंकुश सोनवणे, प्रविण देवरे, यशवंतराव देवरे, गणेश निकम, उमेश आहेर, सुनिल जाधव, गणेश अलई, मानसी पवार, अर्जुन देवरे, दिपक नवले, कृतिका बोरसे, सुभाष जाधव, पोपट मोरे आदी उपस्थित होते. उमेश निकम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम