सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील डाक कार्यालयात कार्यरत असणारे पोस्टल कर्मचारी शुभम धनाजी पगार यांना देवळा बसस्थानकासमोर साडेसात हजार रुपये सापडले. ही सापडलेली रक्कम ज्या कुणाची आहे, ती व्यक्ती शोधूनही न मिळाल्याने त्या रकमेत स्वतःच्या खिशातून आणखी अडीच हजार रुपयांची भर घालत असे दहा हजार रुपये अनाथ व निराधार मुलांसाठी काम करणाऱ्या शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला पगार यांनी गुरुवार (दि.३१) रोजी भेट दिले. त्यांच्या या प्रामाणिक व दिलदारपणाचे कौतुक होत आहे.
Deola | प्रदूषणमुक्त सण व उत्सव साजरे करा; मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर
नेमके काय घडले?
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, देवळा पोस्टमध्ये एमटीएस विभागातील विद्यानगर उपनगरात राहणारे शुभम धनाजी पगार यांना देवळा बसस्थानकासमोर साडे सात हजार रुपये सापडले. तीन दिवस तपास केल्यानंतरही ही रक्कम कोणाची याबाबत उलगडा झाला नाही. जे पैसे आपले नाहीत ते स्वतःजवळ ठेवणे अयोग्य वाटल्याने या रकमेचा सदुपयोग व्हावा या हेतूने या साडेसात हजारात स्वतःच्या खिशातील आणखी अडीच हजार रुपये टाकत असे दहा हजार रुपये अनाथ, निराधार मुलांसाठी व आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदत करणाऱ्या शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टकडे पोहोच केले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.डी.के.आहेर यांच्याकडे या दहा हजार रुपयांचा धनादेश शुभम पगार यांनी सुपूर्द केला. युवकाने दाखवलेल्या याकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
“पोस्टात कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या शुभमने सापडलेले पैसे शिवनिश्चल ट्रस्टकडे आणून देणे हा शुभमचा प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलतेची पावती आहे आणि ट्रस्टच्या कामावर समाजाचा विश्वास आहे आणि ही गोष्ट कुठल्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा आम्हाला कमी वाटत नाही.” – प्रा.डॉ.डी के आहेर, कार्याध्यक्ष – शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम