Deola | वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीर; आहेर कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम

0
4
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय आणि प्रवीण आहेर यांनी वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान आणि नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Deola | प्रा. यशवंत गोसावी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती

रक्तदानाबरोबर नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन

देवळा येथील स्व. पोपटराव आहेर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी सामाजिक उपक्रम हाती घेत, रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले. यात ६३ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. ज्यामुळे आरोग्य क्षेत्राला मदत होणार आहे. याशिवाय नेत्र तपासणी शिबिरात १७० लोकांनी आपल्या डोळ्यांची मोफत तपासणी करून घेतली. तपासणीसाठी बिर्ला आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थिती होती.

Deola | पिंपळगाव जनता विद्यालयात ‘जागतिक हात धुवा दिन’ साजरा

आहेर कुटुंबाकडून रक्तदाते व तज्ञ डॉक्टरांचे आभार

शिबिराचे आयोजन समाजात आरोग्य जनजागृती व सेवा करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. त्यांनी कुटुंबाच्या या सामाजिक सेवाभावी कार्याचे कौतुक केले आणि यामुळे इतरांनाही समाजासाठी काही करण्याची प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त केले. या उपक्रमाचे आयोजन करून कुटुंबियांनी स्वर्गीय पोपटराव आहेर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या समारोपास कुटुंबीयांनी उपस्थितांचे आणि रक्तदाते, तज्ज्ञ डॉक्टर यांचे मनःपूर्वक आभार मानले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here