Ajit Pawar | इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा उमेदवार ठरला?; त्र्यंबकेश्वर येथील सभेत अजित पवारांची अप्रत्यक्ष घोषणा?

0
57
#image_title

Ajit Pawar | निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली असून राज्यात आचारसंहिता लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपावर सध्या चर्चा सुरू असून पुढील एक-दोन दिवसांमध्ये उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु त्याआधी प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांकडून मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. त्यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाशिकच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात सभा पार पडली.

Ajit Pawar | ‘जातीपातीचे, धार्मिक राजकारण नाही तर यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शावर काम करत आहोत’; अजित पवार कडाडले

अजित पवारांचे त्र्यंबकेश्वर येथे खोसकारांच्या समर्थनार्थ जनसमान यात्रा

या सभेत बोलताना अजित पवार यांनी “दोन-तीन दिवसांपूर्वी हिरामण खोसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवगिरी बंगल्यावर पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता इतरांचाही होणार आहेत. हा निवडणुकीच्या काळ असून काम करून घेण्याची धमक असावी लागते, प्रशासनावर पकड असावी लागते, अनेक लोक आमच्याकडे येतात. खोसकर देखील कामानिमित्त माझ्याकडे यायचे. 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होतेय. त्यावेळी महायुती, मनसे, महाविकास आघाडी आणि इतर सर्व देखील उभे राहतील. पण तुम्ही महायुतीला (हिरामण खोसकरांना) निवडून द्या. असे म्हणत पवारांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षपणे घोषणा केली.

अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे केली उमेदवारीची घोषणा

या सभेत बोलताना अजित पवार यांनी “दोन-तीन दिवसांपूर्वी हिरामण खोसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवगिरी बंगल्यावर पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता इतरांचाही होणार आहेत. हा निवडणुकीच्या काळ असून काम करून घेण्याची धमक असावी लागते, प्रशासनावर पकड असावी लागते, अनेक लोक आमच्याकडे येतात. खोसकर देखील कामानिमित्त माझ्याकडे यायचे. 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होतेय. त्यावेळी महायुती, मनसे, महाविकास आघाडी आणि इतर सर्व देखील उभे राहतील. पण तुम्ही महायुतीला म्हणजेच हिरामण खोसकर यांना निवडून द्या. असे म्हणत पवारांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षपणे घोषणा केली.

विरोधकांवर साधला निशाणा

पुढे बोलत, “आम्ही जातपात मानत नाही, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी चालतो. एकमेकांचा सन्मान ठेवतो. वाचाळवीर काहीतरी बोलतात जे आपल्या महाराष्ट्राला न पटण्यासारखे असते. आपण त्याचा त्याचवेळी निषेध करतो. पक्षप्रवेश केलेल्यांना निराश करणार नाही. काही आता म्हणतात की, लाडकी बहिणी योजना बंद केली. परंतु योजना बंद केलेली नाही, आम्ही केंद्रातून निधी आणू. शेतकऱ्यांना किंवा कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधक सत्तेत आले तर योजना बंद पडतील, राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. तेव्हा विरोधकांनी महाराष्ट्राची बदनामी थांबवावी. मी अर्थमंत्री आहे. मला माहित आहे. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी राज्याची बदनामी करू नये.” असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली.

Ajit Pawar | अंगणवाडी सेविकांच्या प्रदीर्घ मागण्या पूर्ण; अजित पवारांची मोठी घोषणा

नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे होणार

आज झालेल्या सभेत अजित पवारांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत भाष्य केले. “परतीच्या पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान होत आहे. बऱ्याच पिकांचे नुकसान झाले आहे. लोक म्हणतात, तुम्ही त्या ठिकाणी पंचनामे करायला सांगा. आचारसंहिता असली तरी नैसर्गिक संकट आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांना सांगून पंचनामे केले जातील.” असे अजित पवार म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here