सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | अवघ्या चार महिन्यापुर्वी स्थापन झालेल्या देवळा येथील श्री. बालाजी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांचा विश्वास संपादन केला असून संस्थेचे कामकाज कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सी. ए. महेश मुंदडा यांनी केले. संस्थेच्या वतीने कर्जदार सभासदांना सी. ए. महेश मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थित वाहनांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अल्पवधीत या संस्थेने 30 सप्टेंबर अखेर 283 लक्ष रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत. तर 2 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्याच बरोबर संस्थेने 1 कोटी 11 लाख रुपयांची सुरक्षीत गुंतवणुक केलेली आहे.
Deola | पाटचारीच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान; नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
सर्व वाहनांचे मार्गदर्शक व सभासदांचे हस्ते पूजन
संस्थेचे कामकाज अतिशय सूत्रबद्ध, बँक प्रणाली सारखे सुरु आल्याने वाखाणण्या जोगे आहे. संस्थेच्या वतीने सभासदांना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर चार चाकी, दुचाकी आदी वाहनांचे वितरित करण्यात आले. संस्थेने जे. सी. बी. मशीन, एम. जी. कंपनीची क्लाॅस्टर, किया कंपनीची सेल्टाॅस तर हुंडइची क्रेटा कार बरोबरच, ट्राॅक्टर, तीन दुचाकी वाहन, इलेक्ट्रिक स्कूटर अशा वाहनांना कर्ज पुरवठा केला आहे. त्या सर्व वाहनांचे संस्थेचे मार्गदर्शक व सभासदांच्या हस्ते पुजन करून सभासदांना वितरित करण्यात आले.
Deola | कोलती नदी पाणलोट क्षेत्रात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनी सापडला
सर्व संचालक मंडळ उपस्थित
या प्रसंगी देंकोचे माजी चेअरमन डाॅ. व्ही. एम. निकम, सुराणा पतसंस्थेचे संस्थापक माजी उपाध्यक्ष अशोक सुराणा, सेवा निवृत्त मुख्याध्यापक कृष्णा बच्छाव, देंकोचे माजी संचालक सतिष राणे, बंडूनाना आहेर, अशोक आहेर, शिवाजी पवार, सचिन सुराणा, एल के निकम, संजय चंदन , उगले, चेतन निकम, डाॅ. वसंतराव आहेर, चेअरमन पवन अहिरराव, व्हा. चेअरमन मोहिनुद्दीन पठाण आदींसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होतेे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम