Deola | भर पावसात पुल ओलांडणे पडले महागात; कोलती नदी पाणलोट क्षेत्रात दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना उघडकीस

0
59
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | हनुमंतपाडा ता. देवळा युवा शेतकरी संजय काशिनाथ रणधीर (५०) हे रविवार (दि.१३) रोजी वार्षि – हनुमंतपाडा रस्त्यावरील फरशी पुलावरून जात असताना कोलती नदीच्या पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या नदीपात्रावरील पाझर तलाव व के.टी.वेअर मध्ये शोध मोहीम राबवून देखील त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने हनुमंत पाडा व खर्डे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी दोन दिवसांपासून मालेगावच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी याकामी अथक प्रयत्न केले असून हाती न लागल्याने ग्रामस्थ व कुटुंबियांना या घटनेची चिंता लागून आहे.

Deola | देवळा येथे चित्रा वाघ यांच्या निवडीचे स्वागत

दोन दिवस शोधमोहीम राबवूनही हाती अपयश

तालुक्यात रविवार (दि.१३) रोजी सायंकाळी पश्चिम भागातील कोलती नदीच्या उगमस्थानाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने कोलती नदीला पूर आला. या पुरात रात्री हनुमंतपाडा येथील संजय रणधीर हे मोटारसायकलवरून सदर पूल ओलांडत असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यात ते वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिले. या पार्श्वभूमीवर सोमवार (दि.१४) व आज मंगळवार ( दि.१५) अशा दोन्ही दिवशी मालेगाव येथील बचाव पथकाने छोट्या मोठ्या पाझर तलावात तसेच वार्षि येथील धरणात शोध मोहीम राबवली. मात्र रणधीर हाती लागत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर नातेवाईक देखील भयभीत झाले आहेत. घटनास्थळी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here