सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | चित्रा वाघ यांच्या निवडीचे देवळयात सुवर्णकार समाजाच्या वतीने फटाके फोडून व पेढ्यांचे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटत आनंद साजरा
राज्यपाल नियुक्त यादीत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर देवळा येथील सुवर्णकार समाजाने महायुती सरकारच्या सर्व प्रमुख नेत्यांचे आभार मानून फटाक्यांची आतिषबाजी करून व पेढ्यांचे वाटप करत आनंद उत्सव साजरा केला यावेळी पवन अहिरराव, राजेंद्र वडनेरे, संजय अहिरराव, भगवानदास खरोटे, योगेश अहिरराव, राकेश अहिरराव, मिलिंद वडनेरे, हेमंत अहिरराव, नंदू जाधव, मनोज अहिरराव, राजेंद्र अहिरराव, कल्पेश अहिरराव, श्रीकांत अहिरराव, परेश अहिरराव आदी समाज बांधव उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम