सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गवर भावडे शिवारात आज गुरुवारी दि. ३ रोजी पुन्हा कार व दुचाकी यांच्यात अपघात घडला. यात दुचाकी वरील दोन्ही जण जखमी झाल्याची माहिती मिळाली असून, त्यांना उपचारासाठी देवळा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
Deola | खालप येथील गुळ खांडसरी उद्योग सुरू; महंत गणेशपुरी महाराजांच्या हस्ते अग्नी प्रज्वलन संपन्न
बुधवारी बसचा अपघात
भावडबारी घाट परिसरात जिओ पंपा समोर बुधवार दि. २ रोजी सकाळी ११ वाजता एसटी बसचा अपघात झाला होता. दैव बलवत्त म्हणून पुढील अनर्थ टळला. याठिकाणी रस्त्यांचे काम रखडल्याने छोट्या छोट्या अपघातांची मालिका सुरूच आहे. यामुळे नागरिकांचा पुन्हा एकदा संताप अनावर झाला आहे. आज गुरुवारी दि. ३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास देवळा नाशिकच्या विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग वरील भावडे परिसरात फिगो कार क्र.एम.एच.15 सी टी 8617 व मोटरसायकल क्रमांक महाराष्ट्र 15 एफ.ए. 3420 यांच्यात अपघात घडला. यात दुचाकीवरील दोन्ही (रा. नाशिक) हे जखमी झाले आहेत. जखमींची नावं समजू शकले नाहीत. त्यांच्यावर देवळा येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
Deola | पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा देवळा बाजार समितीच्या वतीने निषेध
बऱ्याच दिवसांपासून काँक्रिटी करण्याचे काम रखडलेले
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम रखडल्याने अपघाताची मालिका सुरच असून, वाहन धारकांना एकेरी मार्गावरून मार्गक्रमण करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याठिकाणी सद्या नेहमीच अपघात घडत आहेत. या घटना टाळण्यासाठी व प्रवास सुखकर होण्याकामी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रखडलेल्या कामामुळे वाहनधारक व ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम