सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा शहर व ग्रामीण भागात मोटरसायकल व आठवडे बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट वाढला असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात व देवळा शहरात भुरट्या चोऱ्या वाढल्या असून मोटरसायकल व आठवडे बाजारात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिक चिंताग्रस्त असून या चोऱ्यांना आळा बसवावा अशी मागणी केली जात आहे. देवळा शहरातील आठवडे बाजारात प्रत्येक रविवारी महागडे मोबाइल चोरीच्या घटना घडत असल्याने मोबाइलधारक हवालदिल आहेत.
Deola | शारदीय नवरात्रोत्सवात्च्या मुहुर्तावर खानदेशातील भाविक सप्तशृंगी गडावर
खरेदीच्या धावपळीत चोरटे करतायत हाथ साफ
बाजार करणारे त्यांच्या धावपळीत असताना वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल सहज चोरतात. आतापर्यंत असे कितीतरी मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. काहींचे तर असे दोनदोन मोबाईल बाजारात चोरीला गेले आहेत. मोबाईल चोरीला गेल्यावर आवश्यक गरज म्हणून लगेचच दुसरा मोबाईल खरेदी करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत असतो. त्यामुळे मोबाईल चोरांचा शोध घेत त्यांना चांगली अद्दल घडवावी अशी मागणी होत आहे.
“यापूर्वीही माझा एक नवा मोबाईल रविवारच्या आठवडे बाजारात चोरीला गेला होता आणि आता रविवार (दि.३०) रोजी पुन्हा तशाच प्रकारे दुसरा मोबाईल चोरट्यांनी लांबवला.”– वासुदेव देवरे, देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम