सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | येथील सुराणा संस्थेच्या वतीने सभासदांना चालू वर्षात ९ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन प्रदीप सुराणा यांनी दिली. या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दि. २१ रोजी चेअरमन प्रदीप सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तसेच सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
Deola | देवळा सटाणा रस्त्यावर अपघातात महिला ठार
सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार
यावेळी नाफेडचे राज्य संचालक केदार आहेर, सत्तर हजाराहून अधिक मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देणारे. गुलशन चड्डा, ह.भ.प संजय धोंडगे, विशेष वसुली अधिकारी तात्यासाहेव गायकवाड, नांदुरी येथे मोफत वृद्धाचम व अनाथआश्रम चालविणारे गंगा पगार आदींसह सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा, गुणवंत सभासद पाल्यांच्या सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन व्यवस्थापक महेश जोशी यांनी केले. संस्थेचे संस्थापक डॉ. रमणलाल सुराणा यांनी नांदुरी येथील गंगा पगार यांच्या सप्तशृंगी आनंद आश्रमास संस्थेमार्फत बांधकामासाठी रु. १ लाख ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच संस्थेच्या सर्व सभासदांना संस्थेमार्फत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थान भगूर येथे भेट देण्याचे ठरविण्यात आले.
सभेला यांनी लावली हजेरी
संस्थेच्या आर्थिक बाबींची माहिती देतांना चेअरमन प्रदीप सुराणा यांनी सांगितले की, संस्थेचे कार्यक्षेत्र नाशिक जिल्हा असून वसूल भागभांडवल २ कोटी १८ लाख, ठेवी ५२ कोटी ५५ लाख, कर्जवाटप ३० कोटी ४५ लाख, गुंतवणूक ४६ कोटी ३६ लाख, स्वनिधी २३ कोटी, नफा १ कोटी २९ लाख व निव्वळ थकबाकी १.४९% इतकी अत्यल्प आहे. यावेळी व्हा.चेअरमन संजय कानडे, संचालक रमेश संकलेचा, ईश्वरलाल सुराणा, राजेंद्र सुराणा, निलेश कांकरिया, अशोक गुळेचा, सुनिल बुरड, मनोज ठोलीया, संतोष लोढा, सुभाष सोनवणे, जनार्दन शिवदे, सुरेखा सुराणा, शोभा सूर्यवंशी आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम