Deola | देवळा सटाणा रस्त्यावर अपघातात महिला ठार

0
42
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा सटाणा रस्त्यावर आहेरवस्ती नजीक रविवारी (दि. २२) रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास आयशरच्या धडकेत दुचाकी वरील मजूर महिला जागीच ठार झाली असून, पोलिसांनी वाहनासह चालक ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

Deola | राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी मधुकर अहिरे यांची नियुक्ती

देवळा-सटाणा मार्गावर अपघात

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी ( दि.२२) रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास विठेवाडी ता. देवळा येथील मजूर (नवरा बायको) आपल्या दुचाकी वरून माळवाडी येथून कामावरून घरी जात असतांना देवळा सटाणा मार्गावर आहेर वस्ती नजीक देवळ्याच्या दिशेने येत असलेल्या आयशर वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने मोटारसायकल वरील अरुणा (शैला) तातू गवळी (३५) ही महिला जागीच ठार झाली.

Deola | आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व गृह उपयोगी साहित्याचे वाटप 

मयत महिलेचे पती मोटरसायकल चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समजते. अपघात ग्रस्त आयशर वाहन चालकासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here