सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा पोमोग्रेनेट ॲग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन दिपक देवरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी आकाश खुळे (युवा मित्र सिन्नर) व अखिलेश शर्मा (टेक्नो सर्व्ह) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
Deola | माझी वसुंधरा अभियानात देवळा नगरपंचायतीचा प्रथम क्रमांक
केंद्र सरकारच्या सेक्टर सेंट्रल, सेक्टर स्कीम अंतर्गत नाबार्ड या इम्प्लिमेंटिंग एजन्सी द्वारे व युवा मित्र या सीबीबीओ द्वारे देवळा पोमोग्रेनेट ॲग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनीची गेल्या तीन वर्षपूर्वी स्थापना करण्यात आली असून कंपनीचे आतापर्यंत ३९४ सभासद आहेत. या कंपनीमार्फत परदेशात शेतीमाल पाठवला जातो. शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. या कंपनीत तालुक्यातील उत्कृष्ट निर्यात क्षम डाळिंब, द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकरी सभासद आहेत.
Deola | देवळ्यात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत चित्रकला परीक्षांचे आयोजन
अध्यक्षांनी सभासदांचे विशेष आभार मानले
मागील वर्षाचा लेखा-जोखा व पुढील वर्षांचे कंपनीचे ध्येयधोरण सभेत व्यवस्थापक मयुर ठाकरे यांनी मांडले. सभासदांनी दिलेल्या योगदानाबद्दल अध्यक्षांनी सभासदांचे विशेष आभार मानले. यावेळी सचिव जगदीश शिंदे, संचालक सिमा जाधव, शितल गुंजाळ, रामचंद्र आहेर, अंकुश सोनवणे, मुकेश भदाणे, लक्ष्मण माळी, सतिश जाधव, सरला देवरे, लेखापाल तुषार सोनवणे, टेक्नो सर्व्ह अनिशा समल, अविनाश निकम आदींसह कंपनीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम