Deola | माझी वसुंधरा अभियानात देवळा नगरपंचायतीचा प्रथम क्रमांक

0
32
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला असून शासनाकडून नगरपंचायतीला ७५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाल्याची माहिती नगराध्यक्षा भाग्यश्री पवार व उपनगराध्यक्ष मनोज आहेर यांनी दिली. या आधी देवळा नगरपंचायतीला स्वच्छ महाराष्ट्र अभियानात पाच कोटी रुपयांचे बक्षीस देखील मिळाले आहे.

Deola | व्ही.के.डी. विद्यालयाच्या विद्यार्थिनींची बॉल बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

एप्रिल 2023 ते  मे 2024 पर्यंत हे अभियान राबविण्यात आले

देवळा नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भाग घेऊन नाशिक जिल्ह्यात उच्चत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल या नुसार शासनाने ठरवून दिलेल्या निकषावर पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ४.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ ते दिनांक ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले होते. यात देवळा नगरपंचायतीने सहभाग घेतला होता.”

Deola | देवळ्यात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत चित्रकला परीक्षांचे आयोजन

देवळा शहरवासीयांकडून कामगिरीचे कौतुक

यासाठी डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापनासाठी गुण ठेवण्यात आले होते. देवळा नगरपंचायतीने यावेळी नाशिक विभागात चांगली कामगिरी केल्याने प्रथम क्रमांक पटकावला व ७५ लाख रुपयांच्या बक्षसास पात्र ठरली आहे. याकामी नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष मनोज आहेर, माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुलभा आहेर, गटनेते संभाजी आहेर, जितेंद्र आहेर, अशोक आहेर, अतुल पवार आदींसह सर्व नगरसेवकांनी मोलाची कामगिरी बजावली. देवळा शहर वासियांकडुन या कामगिरीमुळे स्वागत करण्यात येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here