सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या जिजामाता कन्या विद्यालयात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत शासकीय इंटरमिजीएट ग्रेड चित्रकला परीक्षा बुधवार दि. २५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
Deola | व्ही.के.डी. विद्यालयाच्या विद्यार्थिनींची बॉल बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड
चित्रकला परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
यात एलिमेंटरी परीक्षेसाठी तालुकाभरातून एकूण १ हजार ९० विध्यार्थी तर इंटरमिजिएट साठी १ हजार ८६ परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. सदर परीक्षा व्यवस्था विद्यालयाच्या एकूण ३७ वर्ग खोल्यांमध्ये करण्यात आली आहे. केंद्र संचालक म्हणून जिजामाता कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक कौतिक खोंडे, केंद्र चालक म्हणून कलाशिक्षक भारत पवार हे परीक्षा केंद्रावर काम बघत आहेत. सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन व शिस्त समिती प्रयत्न करत आहे.
Deola | कै.पी.के. आप्पा आहेर पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
या परीक्षा कालावधीत संस्थेचे चेअरमन प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, सचिव प्रो. डॉ. मालती आहेर, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी भेट दिली. मुख्याध्यापिका प्रतिभा सागर, सुनीता पगार, मनीषा आहेर, संजय पाटील यांसह विविध विद्यालयाचे मुख्याध्यापक, कलाशिक्षक हे परीक्षा केंद्रावर लक्ष ठेऊन होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम