Deola | कै.पी.के. आप्पा आहेर पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

0
44
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा येथील श्री. कै.पी.के. आप्पा आहेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि.२७) रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. व्यवस्थापक रवींद्र गोसावी यांनी अहवाल वाचन केले. याप्रसंगी संस्थापक चेअरमन सुनील उर्फ गोटू आबा आहेर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर सभासद हितचिंतकाचा सत्कार करण्यात आला.

Deola | व्ही.के.डी. विद्यालयाच्या विद्यार्थिनींची बॉल बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

शिक्षक खंडू मोरे यांना शासनाचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार

यात प्रामुख्याने सरस्वतीवाडी येथील कळवण आगाराचे वाहक विनोद चव्हाण यांनी पाच लाख रुपये रोख रक्कम असलेली प्रवासी बॅग प्रामाणिकपणे परत केल्याने, शासनाचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार शिक्षक खंडू मोरे, कालिका माता मंदिर ट्रस्टचा राज्यस्तरीय पुरस्कार शिक्षक सुनील देवरे, गिरणा गौरव आदर्श पुरस्कार मुख्याध्यापक सतिष आहेर, रोटरी क्लब नाशिक यांचा जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार शिक्षक केशव खैरनार आदींचा समावेश होता.

Deola | विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जागृत ठेवावी- प्रा. डॉ.पाटील

सभेला यांनी दर्शवली उपस्थिती

यावेळी चेअरमन प्रफुल्ल आहेर, संचालक जयदीप शिंदे, प्रशांत वाघ, मयूर आहेर, सचिन भदाणे, किशोर खरोटे, नाना आहेर, विकास आहेर आदींसह सतीश कचवे, मयूर शेळके, प्रशांत पगारे, हेमंत देवरे, योगेश अहिरे उपस्थित होते कार्य. संचालक केशव खैरनार यांनी आभार मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here