सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती आणि कल्पकता असेल तर निश्चितच नवउद्योजक तयार होऊ शकतील. असे प्रतिपादन चांदवड येथील फार्मसी महाविद्यालयातील प्रा. डॉ. संजय बी. पाटील यांनी केले. येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने अविष्कार संशोधन स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. प्रा. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांमधील संशोधन व नवविचाराला चालना देण्यासाठी संशोधन स्पर्धा भरविल्या जातात. असे समन्वयक जयवंत भदाणे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
Deola | देवळ्यात पावसामुळे अंगणवाड्यांची दुरावस्था; नागरिकांकडून संताप व्यक्त
पद्वव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांकडून संशोधन प्रकल्प सादर
प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांनी आविष्कारसारख्या संशोधन स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये नवता, कल्पकता आणि उद्योजकता वाढीला लागणार आहे. डॉ. पाटील म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्येही आंतरविद्याशाखीय संशोधनाला महत्त्व दिले आहे. आज वैद्यकीय उपकरणांमध्येही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी प्रयत्नपूर्वक संशोधनवृत्ती जागृत ठेवून सभोवतालच्या घटनांचे, पर्यावरणाचे व निसर्गाचे निरीक्षण केले तर निश्चित नवकल्पना निर्माण होऊ शकतात असे त्यांनी शेवटी सांगितले.
Deola | पिंपळगाव (वा.) जनता विद्यालयाच्या खेळाडूंची तालुका स्तरावर निवड
विविध ज्ञानशाखांच्या पदवी, पद्वव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प या स्पर्धेत सादर केले होते. तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करून निवडक संशोधन कल्पनांची विभागीय पातळीसाठी निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून प्रा. आर. एन. शिरसाठ, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. राकेश घोडे यांनी कामकाज पाहिले. उपप्राचार्य डॉ. डी. के. आहेर यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम