सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | रामेश्वर ता. देवळा येथे कालवा फुटून शेतातील पीक व माती वाहून गेल्याने याची चौकशी तसेच भरपाई मिळावी या मागणीसाठी येथील दीपक साबळे यांनी सोमवार दि. २ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले. सायंकाळी साडेचार वाजता चणकापूर कालवा उपविभागीय अभियंता मि. अ. पालवे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते साबळे यांची भेट घेऊन वाहून गेलेल्या शेतीचे काम महिना भराच्या आत पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर शेतकरी दीपक साबळे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
कालवा ८ वर्षापुर्वी फुटुन तेव्हा सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झालेले आहे
याबाबत अधिक माहिती अशी कि, रामेश्वर ता. देवळा येथील रहिवाशी दीपक साबळे यांची धरणालगत गट नं. ४३९/१/४ मध्ये उपळवट शिवारात जमीन असून, त्या जमिनी लगत रामेश्वर वाढीव उजवा कालवा गेलेला आहे. हा कालवा ८ वर्षापुर्वी फुटुन तेव्हा सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झालेले आहे. यावेळी चार लाख रुपये खर्च करून जमिनीची लेव्हल केली होती. तेव्हाही शासनाने आम्हाला नुकसान भरपाई दिली नाही. भविष्यात परत नुकसान होऊ नये, म्हणुन आम्ही पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दि. २० ऑक्टॉबर या कालव्याला क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्यामुळे पाटाचा भराव आमच्या शेतात पाणी घुसले. यामुळे कांदा रोप व अर्धा एकर क्षेत्रावर लागवड केलेले कांदे, मका पीक वाहून गेले व शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे.
Deola | देवळ्यातील मेशी येथे ट्रॅक्टरच्या रोट्याव्हीटरमध्ये अडकून एकाचा मृत्यू
सायंकाळी उशिरा संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले
याची पाट बंधारे, महसूल विभागाने अद्याप दखल घेतली नाही. या नुकसानीने आमची आर्थिक परिस्थिती खालावली असून आम्हाला याची भरपाई त्वरीत मिळावी. अन्यथा तोपर्यंत कालव्याच्या भरावाचे काम करू दिले जाणारी नाही. असे लेखी निवेदन संबंधित विभागला दिले आहे. तरी देखील दखल घेतली न गेल्याने शेतकरी साबळे यांनी सोमवार दि. २ रोजी रामेश्वर येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. सायंकाळी उशिरा संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी किरण साबळे, जयराम साबळे, लक्ष्मण वनसे, भगवान जाधव, अनिल पगार, नवनाथ साबळे, सुभाष अहिरराव, पोलीस पाटील, दिलीप बागुल आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम