Skip to content

शोधायला गेले एकाला अन्….; तालुक्यातील घटनेने खळबळ


देवळा : “शोधायला गेले एकाला सापडला दुसराच कोणी तरी ” असा प्रकार आज सकाळी तालुक्यातील गिरणा नदी पात्रात शोध मोहिमेत घडूनआल्याने अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात आले आहेत.याबाबत पोलीस यंत्रणा चिंतीत झाली आहे. याबाबतचे वृत्त असे की, काल दि.६ रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास गिरणा नदी पुलावरून युवकाने उडी मारल्याची घटना घडली.

सदर युवक रोशन गोकुळ कुमावत ( वय २१) हा सटाणा येथील असुन या युवकाच्या तपासासाठी आज सकाळी येथील स्थानिक पोहणारे तरुण व देवळा पोलीस यांची शोधमोहीम सकाळपासून सुरू असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या हाती एक मृतदेह लागला असता. ओळखीसाठी म्हणून रोशन कुमावत याच्या कुटुंबियांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी सदर मृतदेह रोशन कुमावत याचा नसल्याचे सांगितले.

शोधायला गेले एकाला सापडला दुसराच असा प्रकार घडल्याने सापडलेला मृतदेह नक्की कोणाचा हाच प्रश्न देवळा पोलिसां समोर उभा राहिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. सदर मृतदेह कोणाचा हा प्रश्नचिन्ह असून हा घातपात की आत्महत्या या विषयी तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. सदर इसमाचा पुरुष मृतदेह बेवारस म्हणून पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास देवळा पोलीस करीत असून बेवारास मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर रविवारी रात्रीच्या अंधारात गिरणा नदी पात्रात उडी घेणाऱ्या रोशन कुमावत यांचा सायंकाळ पर्यत शोध घेण्यात येत होता. मात्र काही हाती लागले नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!