Skip to content

ट्विटर मागोमाग हा सोशल मीडिया देखील करणार टाळेबंदी


मुंबई प्रतिनिधी : ट्विटरमध्ये केल्या जाणाऱ्या टाळेबंदिमुळे गेल्या काही दिवसापासून ट्विटर चर्चेत आहे. ट्विटरमागोमाग सुप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी असणारी फेसबुकनेही मोठ्या प्रमाणावर टाळेबंदीची तयारी केली आहे. मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, फेसबुकची मूळ कंपनी ही Meta Platforms Inc. हजारो कर्मचाऱ्यांना कंपनीतून बुधवारपासून कमी करण्यास सुरुवात करणार आहे.

META मध्ये सध्या सुमारे ८७,००० कर्मचारी हे कार्यरत आहेत. ही कंपनी जगभरातील सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू शकते. यापूर्वी शुक्रवारी ट्विटरने जगभरातील ३७०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या ही निम्म्यावर आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरच्या अखेरीस ट्विटर खरेदी करण्याचा करार पूर्ण केला होता. त्यानंतर कंपनीने अर्ध्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

मस्क नंतर, मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे देखील मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची तयारी करत आहेत. कंपनीचे शेअर्स यंदाच्या वर्षी ७३ टक्क्यांनी घसरले आहेत. फेसबुक आताचे मेटा प्लॅटफॉर्म टिकटॉक (TikTok) आणि यूट्यूब (YouTube) सारखे प्लॅटफॉर्मना जबरदस्त टक्कर देत आहेत. १८ वर्ष जुन्या असणाऱ्या कंपनीपासून वापरकर्ते आता टिकटॉक आणि यूट्यूबकडे वळत आहेत. त्यामुळे कंपनीच्या महसुलावर मोठा प्रमाणावर परिणाम झाला आहे. तसेच या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण देखील झाली आहे. कंपनीकडून नवीन भरतीवर बंदी घातली होती आणि आता ती मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!