Skip to content

सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक


द पॉइंट नाउ प्रतिनिधी : कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर एकदा नव्हे तर अनेकदा आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून सत्तारांनी २४ तासांच्या आत माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देखील देणार नाही, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करते वेळी असं म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला देखील मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देत म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का ? पुन्हा यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला पण ऑफर करत आहात. सुप्रिया सुळेचे हे विधान ऐकून सत्तार भडकले आणि त्यांचा आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं आणि ते म्हणाले, इतकी भिकार….झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ आम्ही खोके.

सुप्रिया सुळेंना या शब्दात शिवीगाळ का केली? असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी सत्तारांना विचारला तेव्हा सत्तार म्हणाले, “ते सतत आम्हाला खोके बद्दल बोलत आहेत त्यांचे डोके तपासायची गरज आहे त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासून घ्यावे लागतील. राजकारण भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो नगरपालिका, पंचायत समित्या, विधानसभा, लोकसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना देखील उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?”


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!