Skip to content

मुजोर मंत्री सत्तारच्या विरोधात देवळा राष्ट्रवादीचे जोडे मारो


देवळा : शिंदे सरकार मधील गद्दार अन् मुजोर दुर्दैवाने अन्नदात्याचे खाते उपभोगत असलेला बेलगाम कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे बेताल वक्तव्य काही थांबताना दिसत नाही. आज या महाशयांनी हिन पातळी गाठली असून खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. मुजोर सत्तारच्या निषेधार्थ देवळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जाहीर निषेध जोडे मारो आंदोलन करण्यात आले .

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ देवळा येथे जोडो मारो आंदोलन करतांना योगेश आहेर ,संतोष शिंदे ,उषाताई बच्छाव आदी (छाया -सोमनाथ जगताप )

यावेळी सत्तार यांच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात येऊन, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर, शहर अध्यक्ष दिलिप आहेर, नगरसेवक संतोष शिंदे, सनी आहेर, दत्तु आहेर, मनोज गुजरे, सचिन सुर्यवंशी, राजेश आहेर, शिवसेनेचे सोमनाथ शिंदे, विश्वनाथ गुंजाळ, मयुर सोनवणे, जितेंद्र भामरे, माजी सभापती उषाताई बच्छाव , वैशाली शिंदे, भाउसाहेब वाघ, महेंद्र आहेर, श्रीकांत अहिरराव, मुन्ना आढाव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाच्या वतीने सहाय्य पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना निषेध निवेदन देण्यात आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!