Skip to content

……अन् केदा आहेरांनी मर्चंट्स बँक संचालकांचे ‘कान टोचले’


देवळा ; तोट्यात असलेली नाशिक येथील देवळा मर्चंट्स बँकेची शाखा बंद करण्यात यावी तसेच येत्या सहा महिन्यात संचालक मंडळाने आपला कारभार सुधारावा , अशी सूचना जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व बँकेचे सभासद केदा आहेर यांनी आज बँकेच्या आज ( २३) रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी केली .

देमकोच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी बोलतांना जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व बँकेचे सभासद केदा आहेर व्यासपीठावर संचालक मंडळ तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित सभासद ( छाया -सोमनाथ जगताप )

दि देवळा मर्चंट को ऑप बँकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सौ कोमल कोठावदे यांच्या अध्यक्षतेखाली वत्सला लॉन्सवर खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आहेर पुढे म्हणाले कि , बँकेला रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कामकाज करावे लागणार असून , यात जातीपातीचे राजकारण न करता ठेवीदारांचा विश्वास संपादन करावा , बँकेची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत आहे . बँकेच्या प्रगतीसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करून , कर्ज वाटप व वसुली करावी . विस्तरित शाखा तोट्यात असेल तर ती बंद कारवी . जेणेकरून बँकेची प्रगती होईल.

यावेळी विषय पत्रिकेतील मयत व पीडित कर्जदाराचे १०० टक्के तरदूद असलेल्या संशयित व बुडीत वर्गवारीतील कर्जखात्यास वसुलीचा हक्क अबाधित ठेऊन निर्लेखित करण्यास मान्यता मिळणे बाबतचा विषय सर्वानुमते नामंजूर करण्यात आला . झालेल्या चर्चेत माजी अध्यक्ष डॉ विश्राम निकम ,रवींद्र मेतकर , माजी संचालक बाबुराव पाटील , पवन अहिरराव ,श्रीकांत अहिरराव आदी सभासदांनी भाग घेतला . व थकीत कर्ज वसुलीवर भर देण्याची मागणी केली .

याप्रसंगी चेअरमन कोमल कोठावदे , व्हा चेअरमन डॉ प्रशांत निकम , जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे , जयप्रकाश कोठावदे , राजेंद्र सूर्यवंशी , अनिल धामणे ,केदारनाथ मेतकर , राजेश मेतकर , भगवान बागड , प्रमोद शेवाळकर , योगेश राणे , हेमंत अहिरराव , मयूर मेतकर ,अमोल सोनवणे , सुभाष चंदन , मनीषा सिनकर , नलीनी मेतकर , तञ् संचालक भारत कोठावदे , सचिन कोठावदे उपस्थित होते . सभेत झालेल्या सर्व विषयांना व्हा चेअरमन डॉ प्रशांत निकम , भारत कोठावदे यांनी समर्पक उत्तरे दिली . सभेला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते . अहवाल वाचन सहायक व्यवस्थापक एन के बोरसे यांनी केले . आभार संचालक हेमंत अहिरराव यांनी मानले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!