रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर, पुढच्या सहा महिन्यांपर्यंत मिळणार मोफत रेशन

0
1

द पॉईंट नाऊ: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) च्या लाभार्थ्यांना सरकार पुढील ६ महिन्यांसाठी मोफत रेशनचा लाभ देऊ शकते, म्हणजेच मोफत रेशनची सुविधा येत्या ६ महिन्यांसाठी वाढवता येण्याची शक्यता आहे. सामान्य जनतेसाठी केंद्र सरकार कडून लवकरच फ्री रेशन स्कीम लागू होणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKAY) असलेल्या लाभार्थींना सरकार पुढील आणखी सहा महिन्यांपर्यंत फ्री राशन योजनेची मुदत वाढवलेली जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते. सरकार लवकरच फ्री राशन देणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ३० सप्टेंबर पासून पुढे वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

फ्री राशन स्कीम ही ३ ते ६ महिन्यांसाठी वाढविण्यात येऊ शकते मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सध्या गरिबांना मोफत ५ किलो धान्य देत आहे आणि असे मानले जाते की सरकार पुढील ३ ते ६ महिन्यांसाठी ती आणखी वाढवू शकते. तथापि, यामुळे सरकारला १० अब्ज डॉलर अधिक पैसे लागतील.

सोमवारी अन्न सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले की सरकार मोफत रेशन योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा विचार करण्यात आला आहे आणि यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, याबाबत शनिर्णय कधी घेतला जाणार याची अधिकृत माहिती दिलेली नाही.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मार्च २०२२ पासून मोफत रेशन देण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत देशभरातील सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत रेशन देण्यात आले होते. सध्या सरकारकडून लोकांना प्रत्येक महिन्याला ५ किलो मोफत रेशन दिले जात आहे. या योजनेला सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिली असून ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत असून पुढेही वाढण्याची शक्यता आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here