Skip to content

दसरा मेळाव्याचा निकालावेळी उद्धव ठाकरे यांचा त्र्यंबकेश्वरमधील शिवसैनिकांशी संवाद


मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वाद अखेर मिटला असून उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. ह्या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हा निकाल जेव्हा लागला, तेव्हा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे त्र्यंबकेश्वरमधील शिवसैनिकांशी संवाद साधत होते.

नंतर जेव्हा ह्या निकालाची माहिती मिळताच लगेच उद्धव यांनी समोर उपस्थित कार्यकर्त्यांना मेळाव्याच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच निवडणुकीच्या तोंडावर रुसवे, फुगवे, वेगळे गट पाडून देऊ नका असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. दरम्यान, ते हेही म्हणाले की, मी लवकरच नाशिकला येणार असून तिथे रेकॉर्डब्रेक गर्दीचा मेळावा आपण घेऊ, असा निर्धार त्यांनी केला आहे.

तत्पूर्वी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आपला उत्साह अमाप आहे, पण एकजुटही तशीच ठेवा. आपल्याला प्रत्येक महापालिका निवडणूक जिंकायचीच आहे, शिवसेनेचा भगवा फडकावयचाच आहे. त्यामुळे निवडणूक आल्यावर रुसवे, फुगवे, गट पडणे अशा गोष्टी होऊ देऊ नका. ह्यात उमेदवारी फार माोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीच्या तयरीला लागा.

यावेळी या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सुनील बागुल व आदी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!