Deola Bajar sameeti nokar Bharti: नोकर भरतीत आधी आवळला फास नंतर उदयकुमारांनी घेतला का मोठा घास ?

0
3

Deola bajar sameeti nokar Bharti: देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आपण विविध अंगांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. यात आपण आज नोकर भरतीचा विषय बघुया नेमक यात आर्थिक गैरव्यवहार काय झाला. आणि कुणाचे हात बरबटले याकडे लक्ष जाणे देखील गरजेचे आहे.

Bajar sameeti election:देवळा बाजार समिती निवडणूक; अंदर की बात है, यह सब साथ है !

देवळा बाजार समिती अस्तित्वात आल्यानंतर प्रशासकीय मंडळाचे पहिले सभापती सुधाकर कोठावदे होते. त्यांनी कर्मचारी घेतले, शिपाई ते क्लार्क असे काही पदे भरली. प्रशासकीय मंडळ जावून निवडणुकीतून सत्ता केदा नाना आणि योगेश आबा यांच्या हाती आली. पूर्वी कर्मचारी घेतलेले असताना देखील या जोडगोळीने जुन्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे कारण देत कामावरून काढले. आणि नवीन नोकर भरती केली. मात्र या नवीन नोकर भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप देखील झाले. जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याने कर्मचारी संतापले आणि त्यांनी न्यायालयीन लढाई लढली. त्यात कोर्टाने जुन्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. या कोर्ट कचेरीसाठी जो काही बाजार समितीच्या तिजोरीवर खर्च आला. तो खर्च तत्कालीन संचालक मंडळाकडून वसूल करण्याचा आदेश कोर्टाने दिलेत. मात्र तो खर्च अद्याप देखील वसुल झालेला नाही. कोर्टाच्या निकालानंतर मात्र ही भरती संशयाच्या भोवऱ्यात सापडली. Deola bajar sameeti nokar Bharti

नवीन नोकर भरती झाल्यानंतर उदयकुमार आहेर यांनी या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप करत वादात उडी घेतली. तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे विनायक मेटे यांच्या माध्यमातून तक्रार करत नोकर भरतीवर स्थगिती आणली. जवळपास दोन वर्ष ही स्थगिती राहिली, मंत्री बदलले पणन खाते राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडे आल्यानंतर योगेश आबा यांनी चांदवड देवळा मतदार संघाचे तत्कालीन आमदार शिरीष कुमार कोतवाल यांना साकडे घातले. यावेळी ही स्थगिती उठविण्यासाठी कोतवाल यांनी महत्वाची भूमिका बजावत ही स्थगिती उठवली. (Deola bajar sameeti nokar Bharti)

मात्र यावेळी सर्वसामान्यांमध्ये कुजबुज सुरू झाली की ज्या उदयकुमार आहेरांनी स्थगिती आणण्यासाठी प्रयत्न केले शेवटी ते नाना आबा या जोडगोळीला मॅनेज झाले. त्यांच्या वाट्याला देखील मोठा मलिदा गेल्याची कुजबुज जोमाने सुरु झाली. यामुळे उदयकुमार पहिल्यांदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले. उदयकुमार प्रत्येक ठिकाणी गाजावाजा करतात आणि नंतर मलिदा भेटला की शांत बसतात याची चर्चा तालुक्यात जोर धरू लागली. खिशातील पैसे संपले की उदयकुमार एक प्रकरण बाहेर काढतात अशा स्वरूपात चर्चेने जोर धरला नाना, आबा आणि दादा यांच्यात मध्यस्थी देवळा शहरातील एका व्यापाऱ्याने घडवून आणली आणि वाटा घाटी केल्याची देखील चर्चा होती. मात्र ही चर्चा आहे याची पुष्टी मीडिया म्हणून आम्ही करत नाही. शेवटी सत्य काय हे या त्रिकुटालाच माहिती. मात्र जनतेला या प्रकरणाचा खुलासा झाला पाहिजे. यासाठी या त्रिकुटाने आपली भूमिका मांडावी एवढी आमची विनंती.(Deola bajar sameeti nokar Bharti)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here