देवळा तालुक्यात आनंदाचा शिधा वाटप उपलब्ध ; तहसीलदार सूर्यवंशी

0
1
गुंजाळ नगर येथील रेशन दुकानात नागरीकांना आनंदाचा शिधा वाटप करतांना भाऊसाहेब आहेर, योगेश गुंजाळ, चेतन गुंजाळ व उपस्थित लाभार्थी (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा : शासनाच्या वतीने शंभर रुपयात देण्यात येणारा आनंदाचा शिधा अखेर तालुक्यात पोहचला असून , त्याचा वाटपाचा आज तालुक्यातील तालुक्यातील सर्व रेशन दुकानातून हे किट कार्ड धारकांना उपलब्ध करून देण्यात आले असून,नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी तहसीलदारांनी केले आहे .

गुंजाळ नगर येथील रेशन दुकानात नागरीकांना आनंदाचा शिधा वाटप करतांना भाऊसाहेब आहेर, योगेश गुंजाळ, चेतन गुंजाळ व उपस्थित लाभार्थी (छाया – सोमनाथ जगताप)

राज्य शासनाने सण उत्सवाच्या पार्श्वभूमी गोर गरीब जनतेसाठी दिवाळी पासून आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला .आता गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्राप्त झालेल्या या किटचे वाटप गुंजाळ नगर येथील रास्त भाव दुकानातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब आहेर, दुकानदार योगेश गुंजाळ ,चेतन गुंजाळ आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . गावातील महिलांनी आनंदाचा शिधा वेळेवर मिळाल्याने आनंद व्यक्त केला. या किट मध्ये एक किलो डाळ,एक किलो रवा,एक किलो साखर,एक किलो गोड तेल,या‌ चार वस्तूंचा समावेश आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here