पेठ: महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील पेठ तालुक्याचे अभिमानाने नाव उंचावत मांगोणे येथील आदिवासी समाजातील कुमारी दर्शना लहू गवळी विप्रो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ट्रेनिंगच्या परीक्षेत वेगवेगळे टप्पे पार करत फायनल परीक्षेमध्ये लेखी मध्ये 99 आणि तोंडी परीक्षेत आऊट ऑफ मार्क्स पाडून भारतातील एकूण विद्यार्थ्यांपैकी वेब डेव्हलपमेंट मध्ये भारतात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
कंपनीने दिलेल्या एक वर्षाचा प्रोजेक्ट 21 दिवसात पूर्ण करून हे रेकॉर्ड करणारी व अमेरिकन कंपनी इतर प्रोजेक्ट कमी वेळात पूर्ण करणारी हे यश मिळवणारी सर्वात कमी वयाची पहिलीच मुलगी ठरली आहे. दर्शनाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगोणे आणि माध्यमिक शिक्षण: के.बी.एच विद्यालय करंजाळी. ता.पेठ येथे झाले होते.
लहानपणापासूनच कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर क्षेत्राकडे जाण्याची ओढ होती. दर्शनाच्या हे कार्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. तिच्या या यशाबद्दल पेठ तालुका व करंजाळी नागरिकांची मान उंचावली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम