मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष, शशी थरूर यांचा करिश्मा ‘फेल’

0
2

दिल्ली : देशात काँग्रेसला घरघर लागल्यानंतर अखेर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला असून 80 वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. खरगे यांनी शशी थरूर यांचा सरळ लढतीत मोठ्या फरकाने पराभव केला. मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 मते मिळाली, तर शशी थरूर यांना केवळ 1072 मते मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 9497 मतदान झाले. यावेळी गांधी घराण्यातील एकही सदस्य अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील नव्हता. गेल्या 24 वर्षात पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा नेता अध्यक्षपदावर पोहोचला आहे. यापूर्वी सीताराम केसरी हे अध्यक्ष होते, जे गांधी घराण्यातील नव्हते.

काँग्रेस मुख्यालयाबाहेर खर्गे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. खरगे यांचे समर्थक ढोल ताशांच्या गजरात त्यांचा विजय साजरा करत आहेत. विजयानंतर सचिन पायलट, गौरव गोगोई, तारिक अन्वर आदी नेते खर्गे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. याशिवाय मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचले आहेत. खरगे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या शशी थरूर यांनीही त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. थरूर यांनी ट्विट केले की, “ही खूप सन्मानाची आणि मोठी जबाबदारीची बाब आहे. मी खर्गे जी यांना त्यांच्या कार्यात यश मिळो अशी शुभेच्छा देतो.” याशिवाय काँग्रेस नेत्यांना मिळालेल्या पाठिंब्याबद्दलही खरगे यांनी आभार मानले.

मल्लिकार्जुन खरगे यांची राजकीय कारकीर्द
मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ते 80 वर्षांचे असून अनेक दशकांपासून सक्रिय राजकारणात आहेत. खरगे हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जातात. खर्गे हे कर्नाटकातील बिदर येथून येतात. त्यांनी बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले असून ते पेशाने वकीलही आहेत. १९६९ मध्ये खर्गे हे पहिल्यांदा कर्नाटकातील गुलबर्गा शहर काँग्रेसचे अध्यक्ष झाले. यानंतर 1972 मध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि विधानसभेत गेले. तेव्हापासून ते 2009 पर्यंत एकूण 9 वेळा आमदार होते. 1976 मध्ये ते पहिल्यांदा कर्नाटकात कॅबिनेट मंत्री झाले. 1988 मध्ये खर्गे यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2005 मध्ये ते कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांनी अनेक मोठी पदे भूषवली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here